अकोला, 13 सप्टेंबर : आपल्या शिक्षणाचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा यासाठी अकोल्यातील एका शेतकरी पुत्राने टिश्यू कल्चर लॅब (Jay Hanuman Tissue Culture Lab) उभारली आहे. पारंपारिक शेतीला फाटा देत शेतकऱ्यांना कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पादन मिळवावे यासाठी या लॅबची स्थापना करण्यात आली आहे. नवं तंत्रज्ञानाचा वापर करून विदर्भातून ही पहिलीच टिश्यू कल्चर लॅब आहे. शेतकऱ्यांसाठी अगदी माफक दरात दर्जेदार रोपं या लॅबमध्ये तयार करण्यात येत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात टिश्यू कल्चरच्या केळी रोपांची लागवड वाढली आहे. यात अकोल्यातील पणज, बोचरासह अनेक गावे अग्रेसर आहेत. दर्जेदार केळीचे उत्पादन व अधिक मिळणारे दर यामुळे टिश्यू कल्चरच्या केळी रोपांच्या लागवडीला शेतकरी प्राधान्य देत आहेत. कमी कालावधीत शेतकर्यांना जास्तीत जास्त उत्पादन मिळावे यासाठी शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे, अकोल्यातही नवं तंत्रज्ञानाचा वापर करून विदर्भातून पहिली टिश्यू कल्चर लॅब सुरू झाली. कमी कालावधीत अधिक उपन्न अकोला जिल्ह्यातील पणजगावापासून 2 किमी अंतरांवर बोचरा इथे जय हनुमान टिश्यू कल्चर प्रयोग शाळा उभारण्यात आली आहे. दिनकर शेषराव जायले यांची ही केळी ऊती संवर्धन प्रयोग शाळा आहे. टिश्यू कल्चरद्वारे केळीच्या लागवडीत त्याच्या सुधारित प्रजातींची रोपे तयार केली जात आहेत. यामध्ये झाडे निरोगी व रोगमुक्त आहे. विकासापासून ते फुलण्यापर्यंत सर्व काही एकाच वेळी इथे घडत आहे. फळांचा आकार आणि प्रकारही अगदी सारखाच असतो. केळीचे पहिले पीक टिश्यू कल्चर तयार केलेल्या रोपांपासून लागवडीनंतर 12-14 महिन्यांत मिळते. याउलट केळीची इतर पद्धतीने लागवड केल्यास फळे येण्यास 17 ते 18 महिने लागू शकतात. याशिवाय शेतकर्यांना एका रोपातून 40 ते 50 किलो उत्पादनही मिळू शकते, अशी माहिती दिनकर जायले यांनी दिली. … असे बनवतात रोपं वनस्पतीच्या ऊतींचा एक लहान तुकडा वाढत्या वरच्या भागातून घेतला जातो. हा टिश्यू तुकडा जेलीमध्ये ठेवण्यात येतो. ज्यामध्ये पोषक आणि वनस्पती हार्मोन्स असतात. त्याचप्रमाणे इथे काही देशी वनस्पतींच्या मदतीनं टिश्यू कल्चरचे अनेक लहान रोपे तयार केले जातात. सध्या हे रोपे प्रत्येकी 13 ते 14 रुपये दरानं विकल्या जात आहे. दरवर्षी किमान सात ते आठ लाख रोपांची इथून विक्री होते. अकोला, यवतमाळ, वाशीम, अमरावती, अंजनगांव सुर्जी यासह अनेक जिल्ह्यातील शेतकरी येथून रोपे खरेदी करत आहे. नोकरी सोडून उभारली लॅब अकोट तालुक्यातील बोचरा येथील दिनकर जायले यांनी 2009 मध्ये एमएससीचे शिक्षण घेतलं. त्यानंतर सिनियर कॉलेजला 2009 ते 2012 पर्यंत शिकवण्याचे काम केलं. शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं म्हणून दिनकर जायले यांनी 2012 मध्ये त्यांच्या 400 ते 450 लोकसंख्या असलेल्या छोट्या गावात एक टिश्यू कल्चर लॅब उभारली. सुरुवातीला काही समस्या आल्या. पण गावकर्यांच्या मदतीने सोडवल्या. हेही वाचा- वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; फळबागा जमीनदोस्त, पिकांचेही अतोनात नुकसान पाहा VIDEO बाहेर राज्यातही रोपांची विक्री टिश्यू कल्चर लॅबचा शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. पूर्वी शेतकरी पुणे किंवा राज्याबाहेरून केळीची रोपे आणायची. आता परिसरातील शेतकऱ्यांना बाहेर जायची गरज नाही. तसेच बाहेरून रोपे आणायची तर प्रति 17 ते 18 रुपयांनी मिळतात मात्र अकोल्यात हा भाव फक्त 13 रुपयांमध्ये प्रति रोप आहे. विदर्भाच्या तापमानाच्या हिशोबाने रोपे तयार करण्यात येत आहे. येथील रोपांची उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात देखील विक्री केली जात असल्याची माहिती टिश्यू कल्चर लॅबचे संचालक दिनकर जायला यांनी दिली. हेही वाचा- पारंपारिक शेतीला फाटा देत अख्खं गाव करतयं केळीची शेती, पाहा VIDEO टिश्यू कल्चरच्या लागवडीचे फायदे 1) टिश्यू कल्चरचे रोपे पालक रोपांसारखी आणि व्यवस्थित राहतात. रोपे कीड आणि रोगांपासून मुक्त राहतात. 2) एकसारख्या वाढीमुळे उत्पादनही वाढते, पिकही लवकर मिळते, त्यामुळे लहान जमिनीचा जास्तीतजास्त वापर करता येऊ शकतो. 3) विशेष म्हणजे, वर्षभरात कधीही पिक घेता येते, रोपे वर्षभर मिळत असतात. कमी वेळात दोनदा पिके घेता येतात. लागवडीची किंमतही कमी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.