वर्धा, 18 ऑक्टोबर : सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा कायद्याने अपराध आहे. यासाठी दंडात्मक कार्यवाहीचे प्रावधान आहे. परंतु, याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे नियम फक्त कागदावरच असल्याचे दिसून येत आहेत. वर्ध्यातील सार्वजनिक ठिकाणे, शासकीय कार्यालयाच्या भिंती, कोपरे थुंकीने रंगले आहेत. त्यामुळे कायदे आहेत, पण अंमलबजावणीचे काय? असा सवाल नागरिक करीत आहेत. धूम्रपान आणि तंबाखूजन्य खर्रा (गुटखा) विक्रीबाबत शासनाने ठोस कायदे केले आहेत. याचसोबत पान खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. मात्र, सर्रास सार्वजनिक ठिकाणे, शासकीय कार्यालये, बस स्थानकावरील कोपऱ्यातील भिंती थुंकीने रंगल्याच्या आढळत आहेत. सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी महिलांनी news18 लोकलशी बोलताना केली. बंदी असताना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बस स्थानक, जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय, जिल्हा परिषदेच्या इमारतीत घाण पाहायला मिळते. अशा सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई होत नाही. त्यामुळे ही घाण अधिकच वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याचसोबत गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी असताना जिल्ह्यात खुलेआम गुटखा, सुवासिक सुपारी, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होताना दिसत आहे. नुकताच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात केवळ 11 पान टपरीवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर कारवाई झाल्याचे आढळले नाही. Video : 10 वी, 12 वी पाससाठी गोल्डन चान्स, 2000 पदांवर होणार महाभरती! तपासणी मोहीम होणार सुरू वर्धा जिल्ह्यात खर्रा खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यापूर्वी काही विक्रेत्यांवर कारवाई केली होती. मात्र, आता परत कारवाई बाबत लवकर मिटींग घेतली जाईल. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास मोठी दंडात्मक कारवाई होणार आहे. लवकरच या कारवाईची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.