जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nitin Gadkari : गडकरींच्या धमकीमागे आरएसएस कनेक्शन; मास्टरमाईंड अफसर पाशाचा धक्कादायक खुलासा

Nitin Gadkari : गडकरींच्या धमकीमागे आरएसएस कनेक्शन; मास्टरमाईंड अफसर पाशाचा धक्कादायक खुलासा

नितीन गडकरी

नितीन गडकरी

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचे फोन आले होते. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • -MIN READ Nagpur,Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

नागपूर, 18 जुलै, उदय तिमांडे :  काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचे फोन आले होते. त्यांच्याकडे शंभर कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. जयेश पुजारीने गडकरींना जेलमधून धमकी दिली होती. या प्रकरणात आता नागपूर पोलिसांनी या सर्व प्रकरणाचा मास्टरमाईंड असलेल्या अफसर पाशा याला ताब्यात घेतलं आहे. अफसर पाशाच्या चौकशीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील रागामुळेच आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी दिल्याचं अफसर पाशा यानं म्हटलं आहे. गडकरी धमकी प्रकरणातील मास्टरमाईंड अफसर पाशा हा बांदलादेश आणि सउदी अरेबियात दहशतवाद्यांच्या संपर्कात आला. त्याने बांगलादेश आणि सऊदी अरेबियात मेकॅनिक म्हणून नोकरी करत असताना दहशतवादी संघटनेच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर त्याने सऊदी अरेबियामधून परतल्यानंतर त्याने बंगळूरूमध्ये दहशतवादी हल्ला कोला होता. त्यानंतर कर्नाटकच्या वेगवेगळ्या जेलमध्ये शिक्षा भोगत असतानाही तो दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय होता अशी माहिती त्याच्या चौकशीमधून समोर येत आहे. अफसर पाशा हा लष्कर ये तोयबा आणि पीएफआयचा दहशतवादी आहे. गडकरी यांना खंडणीची धमकी दिल्याप्रकरणात नागपूर पोलीस गेल्या दोन दिवसांपासून पाशाची कसून चौकशी करत आहेत. त्याच्या चौकशीमधून अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. अफर पाशा याच्या सांगण्यावरून जयेश पुजारी यानं नितीन गडकरी यांच्या कार्यालयात खंडणीचा फोन केला होता अशी माहिती समोर आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात