नागपूर 12 जुलै : पावसाळा सुरू झाल्यापासून अनेक अशा घटना समोर आल्या आहेत, ज्यात घरामध्ये किंवा दुचाकीच्या हेडलाईटमध्ये आणि बूटांमध्ये साप आढळून आले. पावसाळ्यात बिळांमध्ये पाणी गेल्याने साप यातून बाहेर येत पावसापासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी जागा शोधतात. यात अनेकदा ते घरांमध्येही शिरतात. नागपुरातून सध्या अशीच एक घटना समोर आली आहे महिलेच्या स्कूटीच्या हेडलाईटमधून साप निघाल्याची थरारक घटना नागपुरात घडली आहे. स्कूटीच्या हेडलाईटमधून साफ काढत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सीमा ढूलसे नावाच्या महिलेच्या गाडीमध्ये हा साप आढळला. ही महिला बँक योजनेच्या कलेक्शनचं काम करते.
महिलेच्या स्कूटीच्या हेडलाईटमधून साप निघाल्याची थरारक घटना नागपुरात घडली आहे. स्कूटीच्या हेडलाईटमधून साफ काढत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. pic.twitter.com/pWY3x3AbSN
— News18Lokmat (@News18lokmat) July 12, 2023
सीमा ढूलसे मंगळवारी नागपूरच्या वाठोडा परिसरातील एका इमारतीमध्ये कलेक्शनसाठी गेल्या होत्या. इमारतीच्या पार्किंगमध्ये त्यांनी त्यांची स्कूटी पार्क केली होती. काम आटोपून परत आल्यावर त्या आपली गाडी पार्किंगमधून काढत होत्या. यावेळी स्कूटीच्या हेडलाईटच्या मधल्या गॅपमध्ये त्यांना सापाची शेपटी दिसली. त्यांनी लगेच स्कूटर थांबवली आणि सर्पमित्रांना फोन केला. 3 कुत्र्यांनी मिळून सापाला घेरलं, पुढे घडलं थरारक; Video व्हायरल सर्पमित्रांनी घटनास्थळी येऊन हेडलाईटमधून साप बाहेर काढला. हा साप बिनविषारी तस्कर प्रजातीचा असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली आहे. मात्र गाडी काढतानाच साप असल्याचं लक्षात आल्याने महिलेनं वेळीच गाडी थांबवली. चालत्या गाडीत जर साप बाहेर आला असता तर अपघात होण्याची शक्यता होती. सध्या अशाप्रकारे साप दिसल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशात नागरिकांनी विशेष खबरदारी घेणं अतिशय गरजेचं आहे.