नवी दिल्ली, 11 जुलै : जगात अनेक धोकादायक प्राणी आहेत. ज्यांना पाहूनच घाम फुटतो. यातील एक प्राणी म्हणजे साप. सापाला पाहून भलेभले धूम ठोकतात. माणसंच नाही तर प्राणीही सापाला घाबरतात. अनेकदा अशा घटनांचे व्हिडीओही समोर आले आहेत. सध्या समोर आलेल्या घटनेत एका सापासोबत तीन कुत्रे भिडताना पहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ सर्वांना थक्क करत आहे. सापाला पाहून सहसा कुत्रे, मांजर पळ काढतात. मात्र सध्याच्या व्हिडीओमध्ये चक्क कुत्रेच सापाशी भिडताना दिसत आहेत. एक साप आणि तीन कुत्रे यांच्या शिकारीचा थरार सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, झाडीतून लपलेल्या सापाला कुत्रे बाहेर काढतात. तोंडात दाबून त्याला खाली फेकतात. तीन मोठे कुत्रे सापांशी भिडत असून लहान कुत्रेही तिथे मधे मधे करताना दिसत आहेत. साप तिन्ही कुत्र्यांना न घाबरता त्यांच्याशी झुंज करु लागतो. सापही कुत्र्यांवर हल्ला करतो. कुत्रे घेरून सापाला ठार करण्याचा प्रयत्न करत आहेत. शेवटी कुत्रे सापाला मात देण्यात यशस्वी होतात.
@ilhanatalay नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. दरम्यान, सापाचे असे धोकादायक अनेक व्हिडीओ समोर येत असतात. सोशल मीडियावर फोटो व्हिडीओ काही क्षणातच लक्ष वेधून घेतात आणि व्हायरल होतात.