नागपूर, 12 जून, उदय तिमांडे : कल्याण लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये धूसफूस सुरू असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुठल्याही जागेचा उमेदवार ठरवण्याचा अधिकार हा केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डला आहे, त्यामुळे उत्साहाच्या भरात कोणी काही बोललं असेल, त्यांच्याकडचे किंवा आमच्याकडचे कोणी काही बोलले असतील तर त्याला महत्त्व नाहीये, पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल तशाच जागा वाटप होतील. जागा वाटपाचा अधिकार हा राज्याच्या कुठल्याही व्यक्तीला नसल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. आळंदी प्रकरणावर प्रतिक्रिया दरम्यान त्यांनी यावेळी बोलताना आळंदी प्रकरणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच स्पष्ट रुपाने महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांना आवाहन केलं आहे की याचे राजकारण करू नका. मला वाटतं याबाबत आणखी काही नवीन गोष्टी बोलायची गरज नाही. ज्यांना राजकारण करायचाय त्यांनी राजकारण करावे, कारण फडणवीस यांनी काल घटनेबद्दल पूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे. सरकार आपल्या पद्धतीने कारवाई करत आहे, विरोधकांना राजकारण करायचे असेल तर त्यांनी करावे असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. Ashadhi wari 2023 : आळंदीमध्ये नेमकं काय घडलं? पोलिसांकडून दुसरा व्हिडीओ आला समोर मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी काही मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे, अशी देखील चर्चा सुरू आहे. यावर देखील बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय जनता पक्षाचा मी 32 वर्षांपासून कार्यकर्ता आहे, कोणाच्या अधिकारात हस्तक्षेप करेल असं मला वाटत नाही. शिवसेनेत कोणाला मंत्री करायचं कोणाला नाही, हा अधिकार एकनाथ शिंदे यांचा असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.