जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Ashadhi wari 2023 : आळंदीमध्ये नेमकं काय घडलं? पोलिसांकडून दुसरा व्हिडीओ आला समोर

Ashadhi wari 2023 : आळंदीमध्ये नेमकं काय घडलं? पोलिसांकडून दुसरा व्हिडीओ आला समोर

आळंदीमध्ये नेमकं काय घडलं?

आळंदीमध्ये नेमकं काय घडलं?

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात वारकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली होती. या प्रकरणाची दुसरी बाजू मांडणारा व्हिडीओ पोलिसांकडून जारी करण्यात आला आहे.

  • -MIN READ Pune,Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 12 जून : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडला . या सोहळ्यात वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.  मात्र या पालखी सोहळ्यात दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करण्यावरून वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. वारी प्रस्थानावेळी वारकरी आणि पोलिसांचा शाब्दिक वाद झाला . त्याचवेळी वारकऱ्यांनी बॅरिकेट्स तोडले आणि मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलीस वारकऱ्यांना अडवण्यासाठी पुढे सरसावले. मात्र वारकरी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते, त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता, पोलिसांवरही टीका झाली. मात्र पोलिसांनी याच संदर्भातील दुसरा एक व्हिडी आता शेअर केला आहे. पोलिसांकडून नवा व्हिडीओ समोर  पोलिसांकडून आता आळंदीमध्ये जो प्रकार घडला त्याचा नवा व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये आळदींमध्ये पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये जी झटापट झाली त्याची दुसरी बाजू दाखवण्यात आली आहे. व्हिडीओमध्ये वारकऱ्यांचा लोंढा पुढे जाताना दिसत आहे, त्याचदरम्यान पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये वाद झाला. यामध्ये एक पोलीस चंगेरला गेल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

दरम्यान या प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आळंदीमध्ये लाठीचार्ज झाला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ‘पहिली गोष्ट म्हणजे लाठीचार्ज झालेला नाही, मात्र तिथे थोडीफार बाचाबाची आणि झटापट झालेली आहे. 400-500 तरुण वारक ऱ्यांनी बॅरिकेट्स तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनाही थोडं लागलं आहे. आपण व्हिडिओ बघितले तरी तिकडे कोणताही लाठीचार्ज झालेला नाही, त्यांना थांबवण्याचाच प्रयत्न केलेला आहे. नंतर परिस्थिती शांत झाली आहे,’ असं फडणवीस म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात