मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज ठाकरे इन अ‍ॅक्शन मोड, विदर्भाच्या शिलेदारांना धरले धारेवर, दिले नवे आदेश

राज ठाकरे इन अ‍ॅक्शन मोड, विदर्भाच्या शिलेदारांना धरले धारेवर, दिले नवे आदेश

राज ठाकरे यांना उपचार करून हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्यावर बुधवारी शस्त्रक्रिया पार पडणार होती

राज ठाकरे यांना उपचार करून हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्यावर बुधवारी शस्त्रक्रिया पार पडणार होती

गेल्या काही दिवसांतल्या राजकीय उलथापालथीनंतर राज ठाकरे आता विदर्भाच्या दौऱ्यावर आहे

  • Published by:  sachin Salve
विशाल पाटील, प्रतिनिधी नागपूर, 18 सप्टेंबर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तीन दिवसीय विदर्भ दौऱ्याला सुरूवात झाली आहे. नागपूरमध्ये राज ठाकरेंनी सर्व प्रमुख शिलेदारांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये विदर्भाच्या शिलेदारांना राज ठाकरेंनी चांगलेच धारेवर धरले. तसंच, लोकांमध्ये जाऊन काम करण्याचे आदेशही दिले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. नागपूरमध्ये पोहोचल्यानंतर राज ठाकरे यांनी नागपूर येथील शासकीय विश्रामगृह रवी भवन इथं बैठक घेतल आहे. यावेळी राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नागपूरमध्ये पक्षाची बांधणी का होत नाही? असा थेट सवाल विचारला. (शिंदे सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला? दिवाळीआधी मिळणार मंत्रिपदाचे गिफ्ट) तसंच, राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या जाणून समस्या घेतल्या.नागपूर पालिका निवडणुका जाहीर झाल्या असे समजून मतदारांमध्ये जा. कामाला लागा, आपल्याला प्रत्येक जागेवर उमेदवार लढवायचा आहे, असे आदेशच राज ठाकरे यांनी नागपूरच्या दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील प्रतिनिधीच्या बैठकीमध्ये दिले आहे. विशेष म्हणजे, मुंबई-पुणे आणि नाशिक पट्ट्यात राजकीय अस्तित्व असलेल्या मनसेला गेल्या दीड दशकांत विदर्भात फारसं राजकीय अस्तित्व निर्माण करता आलं नाही. पण गेल्या काही दिवसांतल्या राजकीय उलथापालथीनंतर राज ठाकरे आता विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. राज ठाकरे 18 आणि 19 सप्टेंबरला नागपुरात मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. 20 सप्टेंबरला राज चंद्रपूरच्या दौऱ्यावर असणार आहेत. तर 20 आणि 21 सप्टेंबरला ते अमरावतीतल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. (रत्नागिरीत शिवसेनेच्या खासदाराविरोधात शिवसैनिक नाराज, आदित्य ठाकरेंकडे केली तक्रार) राज ठाकरेंनी पक्षस्थापनेपासून अनेक वेळा विदर्भ दौरा केला. पण मनसे विदर्भात कधीच रुजली नाही. एखादा राजकीय अपवाद विदर्भात वगळता मनसेची पाटी कोरीच राहिली. राज ठाकरेंकडे विदर्भात कार्यकर्त्यांची भक्कम फळीही नाही. आताही मनसेला पक्ष वाढवायचा असले तर त्यांना थेट भाजपसारख्या तगड्या पक्षाला टक्कर द्यावी लागणार आहे. राज ठाकरेंसाठी मुंबई-पुणे आणि नाशिकची राजकीय जमीन जेवढी भुसभुशीत होती तेवढी विदर्भात तर नक्कीच नाही. त्यामुळे राज ठाकरेंना एक दोन दौऱ्यांपुरता मर्यादित न राहता विदर्भातल्या राजकीय मशागतीसाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.
First published:

पुढील बातम्या