मुंबई, 18 सप्टेंबर : शिंदे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार मोठ्या प्रतिक्षेनंतर पार पडला. आता दुसरा मंत्रिमंडळाचा विस्तार कधी पार पडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार आता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना दिवाळीच मंत्रिपदाचे गिफ्ट मिळणार अशी चिन्ह आहे शिंदे सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. तसंच पालकमंत्र्यांची घोषणाही त्यामुळे रखडली आहे. त्यामुळे दुसऱ्या विस्ताराकडे शिंदे गट आणि भाजपमधील इच्छुक मंत्री बाशिंग बांधून सज्ज आहे. पण पितृपक्ष आल्यामुळे विस्तार रखडला होता. महिन्याच्या अखेरीस विस्तार होण्याची शक्यता होती. पण, आता विस्ताराला ऑक्टोबरचा पहिला आठवडा उजाडणार आहे. 5 ऑक्टोबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे, असं वृत्त टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीने दिले आहे. (रत्नागिरीत शिवसेनेच्या खासदाराविरोधात शिवसैनिक नाराज, आदित्य ठाकरेंकडे केली तक्रार) पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांना संधी न मिळाल्यामुळे कमालीचे नाराज झाले होते. त्यामुळे दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. याच बरोबर जालन्याचे शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर, संभाजी पाटील निलंगेकर, हर्षवर्धन पाटील, बबनराव लोणीकर, बबनराव पाचपुते, राणा जगजितसिंह यांच्यासह जवळपास 50 जणांची नाव चर्चेत आहे. पण, मंत्रिमंडळाची संख्या पाहता यातील अर्ध्याचं नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या मंत्रिमंडळात 19 जणांचा शपथविधी पार पडला आहे. मुख्यमंत्र्यांसह एकूण 43 मंत्र्यांचं जम्बो मंत्रिमंडळ असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.