जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / रत्नागिरीत शिवसेनेच्या खासदाराविरोधात शिवसैनिक नाराज, आदित्य ठाकरेंकडे केली तक्रार

रत्नागिरीत शिवसेनेच्या खासदाराविरोधात शिवसैनिक नाराज, आदित्य ठाकरेंकडे केली तक्रार

राजापूर उपविभाग प्रमुख संतोष चव्हाण यांच्या मार्फत शिवसैनिकांच्या सह्यांचे पत्र आदित्य ठाकरे यांना देण्यात आले.

राजापूर उपविभाग प्रमुख संतोष चव्हाण यांच्या मार्फत शिवसैनिकांच्या सह्यांचे पत्र आदित्य ठाकरे यांना देण्यात आले.

राजापूर उपविभाग प्रमुख संतोष चव्हाण यांच्या मार्फत शिवसैनिकांच्या सह्यांचे पत्र आदित्य ठाकरे यांना देण्यात आले.

  • -MIN READ Ratnagiri,Ratnagiri,Maharashtra
  • Last Updated :

रत्नागिरी, 18 सप्टेंबर : शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे आधीच मोठी वाताहत झाली आहे. आता रत्नागिरीमध्ये शिवसेनेत आपल्याच्या खासदाराविरोधात शिवसैनिक अस्वस्थ असल्याचे समोर आले आहे. खासदार विनायक राऊत यांच्या रिफायनरी प्रकल्पच्या विरोधी भूमिकेबाबत शिवसैनिकांनी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. खासदार विनायक राऊत यांच्या रिफायनरी प्रकल्पच्या विरोधी भूमिकेबाबत शिवसैनिक अस्वस्थ झाले आहे. त्यामुले विनायक राऊत यांची शिवसैनिकांनी केली युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंकडे तक्रार केली आहे. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधातल्या शिवसेना विनायक राऊत यांच्या भूमिकेची शिवसैनिकांनी तक्रार केली आहे.. ( विनायक राऊतांची मुख्यमंत्री शिंदेंवर शिवराळ भाषेत टीका, तर फडणवीसांचे केले कौतुक) राजापूर उपविभाग प्रमुख संतोष चव्हाण यांच्या मार्फत शिवसैनिकांच्या सह्यांचे पत्र आदित्य ठाकरे यांना देण्यात आले. ९० टक्के ग्रामस्थांचा विरोध अशी चुकीचं वक्तव्य खासदार विनायक राऊत यांच्याकडून होताना पहायला मिळते. राजापूर तालुक्यातील सव्वाशे गावांचा प्रकल्पाला पाठिंबा आहे. विरोध करणाऱ्या दोन ते चार गावात विरोधाचा सुर आहे. त्यांना वगळून प्रकल्पाला मुहुर्त स्वरुप देण्यासाठी शिवसेनेने सहकार्य करण्याची पत्राद्वारे मागणी केली आहे. (  पुन्हा 100 कोटींचा आरोप, रामदास कदमांचा आदित्य ठाकरेंवर मोठा बॉम्ब ) शिवसैनिकांनी दिलेल्या पत्राची प्रत news 18 लोकमतच्याच्या हाती लागली आहे. तरुण पिढीतील मूल ही नोकरी धंद्याच्या शोधात पुणे, मुंबईला जातात. हा महाकाय प्रकल्प राजापूरला झाला तर नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, अशी भावना या पत्रातून व्यक्त केली आहे. या पत्रावर विभागप्रमुखापासून ते शिवसेनेच्या ग्रामपंतायत सदस्यांच्या सह्या आहेत. त्यामुळे शिवसेना राऊत यांना समज देणार का हे पाहण्याचे ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात