मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज ठाकरे आज पुन्हा घेणार चंद्रशेखर बावनकुळेंची भेट; भेटीमागचं कारण आलं समोर

राज ठाकरे आज पुन्हा घेणार चंद्रशेखर बावनकुळेंची भेट; भेटीमागचं कारण आलं समोर

राज ठाकरे (Raj Thackeray) चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. कोराडी येथील निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे.

  • Published by:  Kiran Pharate
नागपूर 19 सप्टेंबर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे अनेक नेत्यांच्या तसंच पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. रविवारीच ठाकरे यांची नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत भेट झाली. या दोन्ही बड्या नेत्यांनी नागपुरात फुटाळा तलावात म्युझिकल फाऊंटेन शो पाहिला. यानंतर आता आज राज ठाकरे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार असल्याचं समोर आलं आहे. नागपुरात जगभरातला भव्य फाऊंटन शो जे पाहून राज ठाकरेही भारावले, नेमका काय आहे प्रोजेक्ट? राज ठाकरे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. कोराडी येथील निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. ही सदिच्छा भेट असली तरीही या भेटीत निश्चितच राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे. मागच्या काही दिवसांपासून मनसे भाजप युतीची चर्चा आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. याआधीही काही आठवड्यांपूर्वीच राज ठाकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाली होती. मुंबईत राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट झाली होती. या भेटीवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले होते, की कौटुंबिक संबंधातून राज ठाकरेंची मी भेट घेतली आहे. राजकीय अर्थ काढू नका. युतीबाबत जो काही निर्णय घ्यायचा तो केंद्रातील नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा, अमित शाह, देवेंद्र फडणवीस हे घेतील. मी प्रदेशाध्यक्ष म्हणून भाजपा कशी वाढेल हीच माझी जबाबदारी, युतीबाबत जी भूमिका असेल ते वरिष्ठ नेते घेतील असं ते यावेळी म्हणाले होते. राज ठाकरे-नितीन गडकरींची नागपुरात भेट, मनसे अध्यक्षांनी सांगितला मनं जुळण्यामागची कारणं महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपा-मनसेची जवळीक वाढू लागली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत भाजपा नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. त्यामुळे आजची ही भेट नक्की कशासाठी आहे किंवा यात युतीबाबत काही चर्चा होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
First published:

Tags: Raj Thackeray

पुढील बातम्या