मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नागपुरात जगभरातला भव्य फाऊंटन शो जे पाहून राज ठाकरेही भारावले, नेमका काय आहे प्रोजेक्ट?

नागपुरात जगभरातला भव्य फाऊंटन शो जे पाहून राज ठाकरेही भारावले, नेमका काय आहे प्रोजेक्ट?

नागपुरात जगभरातला भव्य फाऊंटन शो जे पाहून राज ठाकरेही भारावले

नागपुरात जगभरातला भव्य फाऊंटन शो जे पाहून राज ठाकरेही भारावले

नागपुरात तलावातील म्युझिकल फाऊंटन शो पाहिल्यानंतर राज ठाकरेदेखील भारावले. कार्यक्रम पाहिल्यानंतर त्यांनी नितीन गडकरी यांचं कौतुक केलं.

  • Published by:  Chetan Patil
नागपूर, 18 सप्टेंबर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यांचा नागपूर दौऱ्याचा रविवारी पहिला दिवस होता. त्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फुटाळा तलावातील म्युझिकल शो पाहण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. गडकरींचं निमंत्रण स्वीकारुन राज ठाकरे आज संध्याकाळी फुटाळा तलावातील म्युझिकल फाऊंटन शो पाहण्यासाठी गेले होते. म्युझिकल शो पाहिल्यानंतर राज ठाकरेदेखील भारावले. कार्यक्रम पाहिल्यानंतर त्यांनी नितीन गडकरी यांचं कौतुक केलं. यावेळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना नितीन गडकरींनी म्युझिक फाऊंटन शो किती भव्यदिव्य असेल याबाबत माहिती दिली. "फुटाळा तलावातील म्युझिकल फाऊंटन शो एकाच वेळी पाच हजार लोकं बघू शकतील अशी योजना आम्ही करत आहोत. त्यासाठी खुर्च्या मागवल्या आहेत. तलावाच्या मध्यभागी 80 हजार चौरस फुटाचं मोठं रेस्टॉरंट होणार आहे. तिथे बोटीतून जाता येणार आहे. त्याच्यामागे एक इमारत बनत आहे. ती सध्या चार मजली बनली आहे. तिचं सध्या काम सुरु आहे. ती इमारत अकरा मजली आहे. त्या इमारतीत 1100 गाड्यांचं पार्किंग आहे. तिथे तिसऱ्या मजल्यापासून गरीब माणसाला पावभाजी आणि भेळपुरी खाता येईल", अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. (राज ठाकरे-नितीन गडकरींची नागपुरात भेट, मनसे अध्यक्षांनी सांगितला मनं जुळण्यामागची कारणं) चार मल्टीप्लेक्स, जागतिक दर्जाचं खूप मोठं फ्लॉवर गार्डन होणार "दहाव्या मजल्यावर चार मल्टीप्लेक्स आहेत. आणि अकराव्या मजल्यावर रेस्टॉरंट आहे. तेलंगडी तलावासमोर 700 गाड्यांचं पार्किंग असणार आहे. तिथून डायरेक्ट म्युझिकल फाऊंटनला येण्याची सोय होणार आहे. त्या तलावाला आम्हील लोटस गार्डन बनवणार आहोत. त्यासाठी सध्या 950 कमळाच्या जाती एकत्रित केलेल्या आहेत. इथून पलिकडे आणखी एक गार्डन आहे. तिथे आम्ही साडेपाच हजार गुलाबाच्या जाती एकत्रित केलेल्या आहेत. तो परिसर खूप मोठा आहे. त्या जागेवर जागतिक दर्जाचं खूप मोठं फ्लॉवर गार्डन होणार आहे", अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. दिग्गज कलाकारांचं योगदान "हे फाऊंटन 60 मीटर उंचीवर जाणारं पहिलं फाऊंटन आहे. याचे आर्किटेक्ट हे फ्रान्सचे आहेत. त्याचे पंप तुर्कीमधले आहेत. या फाऊंटनसाठी ए आर रहमान यांनी संगीत दिलं आहे. या फाऊंटनमध्ये इंग्रजीत अभिनेता अमिताभ बच्चन, हिंदीत गुलजार साहेब आणि मराठीत नाना पाटेकर यांचा आवाज दिला गेला आहे. त्यांच्या आवाजात माहिती दिली जाणार आहे. पाच ऑस्कर विजेते संहीत तज्ज्ञ आहेत. त्यांनी संगीत दिलं आहे. तेलगू, कन्नड आणि तामिळ चित्रपटात काम करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री रेवतीने या शोच्या शूटसाठी काम केलेलं आहे. याचे कन्सर्टन्ट इंजिनीअर भाऊ सालबेकर आहेत", असं नितीन गडकरी म्हणाले. "आज जी गाणी आपण ऐकली ती नवीन होती. आपण एवढ्या मोठ्या संख्येने येतात, माझी एक विनंती आहे ज्याने एकदा हा शो बघितला त्यांनी पुन्हा येऊ नका. कारण आम्हाला हे अनकंट्रोल झालंय. त्यामुळे सहकार्य करा. रोज तीन शो होतील", अशी देखील माहिती त्यांनी दिली.
First published:

Tags: Nagpur, Raj Thackeray

पुढील बातम्या