नागपूर, 28 डिसेंबर : पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, नागपूर विभागीय कार्यालयातील राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन- दुरूस्ती कामांचे छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागपुरातील सिव्हील लाईन्स येथील मध्यवर्ती संग्रहालय, अस्थायी प्रदर्शन दालन येथे हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. नागरिक अगदी मोफत हे प्रदर्शन पाहू शकणार आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तसेच जागतिक वारसा सप्ताह अंतर्गत साहाय्यक संचालक पुरातत्त्व विभाग प्रादेशिक कार्यालय, महाराष्ट्र शासन, नागपूर यांच्यातर्फे या विभागाशी निगडित राज्य संरक्षित स्मारकांच्या मागील 10 वर्षातील जतन / दुरुस्ती कामांच्या छायाचित्रांचे तसेच नकाशे व इतर आनुषंगिक माहितीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या अंतर्गत एकूण सहा सहाय्यक संचालक, पुरातत्त्व प्रादेशिक कार्यालये आहेत. यामध्ये औरंगाबाद, नांदेड, रत्नागिरी, नाशिक, नागपूर आणि पुणे विभागाचा समावेश आहे. सहाय्यक संचालक, नागपूर पुरातत्त्व विभागामध्ये 11संरक्षित स्मारकांचा समावेश आहे. यामध्ये चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला बुलढाणा जिल्ह्यामध्ये विविध स्मारकांचा समावेश आहे. Video : शिक्षण सोडून सुरू केलं हॉटेल, इंजिनिअरिंग ड्राॅप आऊटची नागपुरात चर्चा वारसा स्थळाचे जतन या प्रदर्शनात नागपूर पुरातत्त्व विभाग संचालनालयाद्वारे दुरुस्ती केलेल्या महापुरुषांची जन्मस्थळे, मंदिरे, लेणी, समाधी, घुमट, दर्गा, ईदगाह, कबर, महाल, गुरुद्वारा, चर्च, बाग दरवाजे, बारव, पाणचक्की, विजयस्तंभ इत्यादीचां समावेश करण्यात आला आहे. राज्यातील देदीप्यमान वारसा स्थळाबद्दल जनतेला माहिती व्हावी, तसेच या वारसा स्थळाचे जतन, संवर्धन, आणि संरक्षण व्हावे यासाठी जनजागृती व्हावी हा या प्रदर्शनामागील मुख्य उद्देश आहे. 10 वी पास तरुणांना गोल्डन चान्स, 925 जागांसाठी होणार भरती! लगेच करा अर्ज मोफत प्रदर्शन नुकतेच या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. दिनांक 28/12/2022 ते 1/01/20220 पर्यंत हे प्रदर्शन नागरिकांना मोफत बघता येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.