मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Solapur : 10 वी पास तरुणांना गोल्डन चान्स, 925 जागांसाठी होणार भरती! लगेच करा अर्ज

Solapur : 10 वी पास तरुणांना गोल्डन चान्स, 925 जागांसाठी होणार भरती! लगेच करा अर्ज

 बेरोजगार युवकांसाठी रोजगार मिळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

बेरोजगार युवकांसाठी रोजगार मिळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

बेरोजगार युवकांसाठी रोजगार मिळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Solapur [Sholapur], India

    सोलापूर, 28 डिसेंबर : जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शक केंद्र सोलापूर यांच्यावतीने 29 डिसेंबर 2022 रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील बेरोजगार आणि नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीने हा ऑनलाइन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त सचिन जाधव यांनी दिली आहे.

    या रोजगार मेळाव्यात 10 वी, 12 वी, ट्रेनी, आय.टी.आय, वेल्डर, फिटर, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, एम.एस.डब्ल्यु, एम.बी.ए, ऑफिस असिस्टंट, बी.एस.सी, एम.एस.सी, बी.कॉम, कोणतीही पदवी, टेलिकॉलर, ट्रेनी, ड्रायव्हर, इलेक्ट्रीशीय अशा प्रकारच्या एकुण 925 पदांचा समावेश आहे. ही रिक्तपदे 6 उद्योजकांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अधिसुचीत केलेली आहेत.

    हा चान्स सोडू नका! ग्रामीण भागातील तरूणांना उघडणार मोठ्या कंपनीची दारं

    मेळाव्याचा अधिकाधिक उमेदवारांनी लाभ घ्यावा

    नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in सदर संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध असणाऱ्या रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेतजर कोणत्या उमेदवाराला कोणती तांत्रिक अडचण आली तर 0217 - 2950956 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता. अथवा जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शक केंद्र, नार्थकोटपार्क चौक सोलापूर येथे प्रत्यक्षात संबंधित अधिकाऱ्यांना भेटू शकता. तरी या रोजगार मेळाव्याचा अधिकाधिक उमेदवारांनी लाभ घ्यावा,  असं आवाहन सचिन जाधव यांनी केले आहे.

     

    First published:

    Tags: Career, Local18, Solapur