जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : शिक्षण सोडून सुरू केलं हॉटेल, इंजिनिअरिंग ड्राॅप आऊटची नागपुरात चर्चा

Video : शिक्षण सोडून सुरू केलं हॉटेल, इंजिनिअरिंग ड्राॅप आऊटची नागपुरात चर्चा

Video : शिक्षण सोडून सुरू केलं हॉटेल, इंजिनिअरिंग ड्राॅप आऊटची नागपुरात चर्चा

इंजिनिअरिंग ड्राॅप आऊट असं हॉटेलचं आगळेवेगळे नाव पाहून रस्त्याने येजा करणारे आकर्षित होतात.

  • -MIN READ Local18 Nagpur,Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

    नागपूर, 27 डिसेंबर : सरकारी नोकरी मिळवणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु असे भाग्यवान मोजकेच असतात ज्यांची स्वप्ने पूर्ण होतात. बाकीचे लोक हताश होऊन त्यांना रोजगाराची दुसरी साधने शोधावी लागतात. नागपुरातील   दोन भावंडांना नोकरी मिळाली नसल्याचे त्यांनी चहा विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. इंजिनिअरिंग ड्राॅप आऊट अस त्यांच्या हॉटेलचं नाव असून हे नाव पाहून रस्त्याने येजा करणारे आकर्षित होतात.   आयुष्यात लाख संकटे येत असतात जे संकटाशी लढतात विजयश्री त्यांच्याच गळ्यात यशाची माळ घालत असते. असाच काहीसा प्रकार घडला आहे तो नागपुरातील इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या दोन भावंडासोबत. काही कारणास्तव इंजिनिअरिंगचे शिक्षण मध्येच सोडावे लागले आणि घरची जबाबदारी सांभाळावी लागली. दरम्यानच्या काळात अनेक ठिकाणी कामातून, अनुभवांतून अशीच एक भन्नाट संकल्पना सुचली आणि जे शिक्षण शेवटच्या वर्षांत मध्येच सोडून द्यावे लागले त्याच नावे इंजिनियरिंग ड्रॉप आऊट हा नवा व्यवसाय सुरू करून या दोन भावंडांनी परिस्थितीवर मात केली आहे. नागपुरातील बजाज नगर चौकातील हमरस्त्यावर इंजिनिअरिंग ड्रॉप आऊट नावाने आम्ही एक व्यवसाय सुरू केला आहे. काही कारणास्तव आम्हाला इंजिनियरिंगचे शिक्षण मध्येच सोडावे लागले आणि मिळेल ते काम करून घराची जबाबदारी सांभाळावी लागली. दरम्यानचा काळात हॉटेल इंडस्ट्रीमध्ये अनेक ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आणि त्यातून नवनवीन कलागुण शिकण्यास मिळाले. 60 पेक्षा अधिक पदार्थ सुरुवातीला मी घरीच काही पदार्थ बनवण्यास सुरुवात केली व त्याची चव अप्रतिम असल्याने आपण स्वतः एक व्यवसाय सुरू करावा असे डोक्यात आले. इंजिनिअरिंग सोडल्यामुळे आम्ही ज्या क्षेत्रात आलो तेच कारण डोळ्यापुढे ठेवून आम्ही इंजिनिअरिंग ड्रॉप आउट हे नाव देण्याचा  ठरवले. आमच्याकडे 60 पेक्षा अधिक पदार्थ आहेत. त्यातील मुख्य म्हणजे कुल्लड टी, कुल्लड कॉफी , कुल्लड पिझ्झा कुल्लड बर्गर कुल्लडमध्ये सर्व्ह करण्यात येणारे पदार्थ आहेत. मटकीचा चमचमीत रस्सा, टम्म फुगलेली पुरी, समाधानने जपली 23 वर्षांची परंपरा, VIDEO कॉफीला विशेष पसंती   विशेषतः चाय आणि कॉफी हे कुल्लडमध्ये सर्व्ह करण्यात येतात. आणि चाय, कॉफी पिऊन झाले की आपण ते कुल्लड खाऊ शकतो. कुल्लड चाय, कॉफीला आमच्या इथे विशेष पसंती येत आहे. मी व माझा भाऊ मिळून आम्ही हा व्यवसाय सुरू केला आणि नागपूरकरांचा चांगला प्रतिसाद आम्हाला लाभत असल्याचे शॉप चे मालक राकेश नानवटकर यांनी सांगितले.   60 हजारांतून सुरू केला व्यवसाय हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आम्हाला सुरुवातीला साठ हजार रुपयांचा खर्च आला असून भविष्यात एक दुकान घेण्याचा आमचा मानस आहे. अल्पावधीतच आमच्या पदार्थांचे अनेकांनी कौतुक केले. विशेषता आमच्या दुकानाचे नाव, त्यामागील कारण याबद्दल लोकांना जाणून घेण्यास उत्सुकता असते. निसर्गरम्य वातावरणात घ्या झटका मिसळचा आस्वाद, पाहा VIDEO शिक्षण हे आजच्या युगात अतिशय महत्त्वपूर्ण आहे. मात्र व्यवसाय हा देखील आपल्याला सन्मानाने जगण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे कुठली लाज न बाळगता तरुणांनी कुठेही खचून न जाता व्यवसाय देखील करायला हवा असे मत अतुल नानवटकर यांनी व्यक्त केले.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: Local18 , nagpur
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात