नागपूर, 07 डिसेंबर : शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये’ अशा आशयाची म्हण प्रचलित आहे. मात्र, समाजात वावरताना अशा काही घटना घडत असल्यास अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी आपण न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास दर्शवून कोर्टातच दाद मागतो. मात्र, न्याय प्रक्रियेत कायदेविषयक सल्ला मिळवणे ही पहिली प्रक्रिया असून ती सर्वसामान्यांच्या दृष्टीने खर्चीक आणि गुंतागुंतीची असते. ही उणीव लक्षात घेता नागपुरातील पाथ फाउंडेशनच्या वतीने मोफत कायदेविषयक सल्ला देण्यासाठी ‘विधी हेल्पलाईन’ नावाने अभिनव उपक्रम सुरू केला आहे. गेल्या दोन वर्षापासून गडचिरोली, चंद्रपूर सारख्या आदिवासी बहुल दुर्गम भागातील नागरिकांच्या मूलभूत अधिकारांच्या प्रश्नांवर एक वकील म्हणून काम करत असताना, असे लक्षात आले की, न्यायाच्या प्रक्रियेत न्याय विषयक सल्ला मिळवणे ही पहिली पायरी आहे. या पहिल्या पायरीचा एक्सेस न मिळाल्याने अनेक गरीब शोषित वंचित समाजातील जे प्रश्न आहेत ते न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचू शकत नाहीत. न्याय विषयक प्रक्रिया सर्वसामान्यांसाठी सोपी करता यावी आणि कायदेविषयक सल्ला कसा देता येईल यासाठी आम्ही काम करण्यास सुरुवात केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवर्तन दिनाच्या निमित्ताने विधी नावाने मोफत कायदेविषयक सल्ला देणारी हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून समाजातील शोषित वंचित तळागाळातील लोकांचे जे प्रश्न असतील त्यांना मोफत कायदेविषयक सल्ला देण्यासाठी आम्ही हेल्पलाईनच्या माध्यमातून काम करणार आहोत, अशी माहिती ॲड बोधी रामटेके यांनी दिली. 30 मिनिटे ऑनलाईन संवाद विधी हेल्पलाईनच्या माध्यमातून कायदेविषयक प्रश्नांवर पाथ फाउंडेशनच्या वकिलांसोबत 30 मिनिटे ऑनलाईन संवाद साधता येईल. या हेल्पलाइनमध्ये आम्ही एक फॉर्म उपलब्ध करून दिला आहे, ज्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न, त्यांची पार्श्वभूमी इत्यादी माहिती आमच्या पुढे येईल. त्या माहितीच्या आधारे प्रत्येक व्यक्तीला तीस मिनिटांचा कालावधी देण्यात येईल. या तीस मिनिटांच्या कालावधीत त्यांना मोफत कायदेविषयक सल्ला देण्यात येणार आहे. तुम्ही लढत असलेल्या खटल्यातील विरुद्ध पक्षाचा मृत्यू झाला तर? पहिले काम हे करा याबाबत कायदेविषयक सल्ला ज्यात प्रामुख्याने उपेक्षित, शोषित गटांचे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन, जनहीत याचिका, जमिनीचे विवाद, फौजदारी जामीन, घटस्फोट व इतर कौटुंबिक कायदेविषयक प्रकरण, महिला- ट्रान्सजेंडर यांच्यावरील हिंसाचार, मृत्यूपत्र व प्रोबेट, जन्मपत्र व इत्यादी कायदेविषयक समस्यांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक वकिलांची साथ उपक्रमाची सुरुवात होताच आम्हाला 20 हून अधिक लोकांच्या समस्या जाणून घेता आल्या. यावरून समाजातील तीव्रता आमच्या लक्षात आली असून या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक वकील देखील आमच्या उपक्रमाला जुळले आहेत. गडचिरोली भामरागड सारख्या दुर्गम भागात लोकांना कदाचित या लिंकचा फार उपयोग होणार नाही याची आम्हाला जाणीव आहे. मात्र, कुठल्या कार्यात सुरुवात होणे गरजेचे असल्याने आम्ही या उपक्रमाला सुरुवात केली आहे. #कायद्याचंबोला : स्त्रियांच्या मालमत्तेचा खरा वारस कोण असतो? मुलगा, मुलगी की पती अशा मिळेल सल्ला भविष्यात या दुर्गम भागांची गरज लक्षात घेता आम्ही टोल फ्री नंबर लवकरच आणणार आहोत, जेणेकरून ते इतर समाजातील वंचित, दुर्गम, आदिवासी बहुल भागात कार्यरत राहील, या हेल्पलाइनच्या माध्यमातून समाजातील गरजू नागरिकांना मोफत न्यायविषयक सल्ला देण्यात येणार आहे, अशी माहिती ॲड बोधी रामटेके यांनी दिली. कॉल बुकिंगसाठी खाली दिलेल्या लिंकवर किंवा वेबसाईट वर जावे. https://forms.gle/NoPMPaSCp9Jrkwf66. pathfoundationofficial.in
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.