नागपूर, 10 जुलै: महाराष्ट्रातील पट्टेदार वाघोबांचं राज्य म्हणजेच नागपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प होय. वाघाच्या एक झलक दर्शनासाठी सर्वांच्या आवडीचं ठिकाण म्हणजे हा सर्वात मोठा आणि सर्वात जुना व्याघ्र प्रकल्प आहे. वर्षाकाठी येथे देशविदेशातून लाखो पर्यटक येत असतात. इथल्या जंगलाने क्वचितच कुणाला निराश केलं असेल. नुकतेच वन्यजीव छायाचित्रकार किरण घाटगे यांनी येथील एक व्हिडिओ कॅमेरात कैद केला आहे. यात तेलिया तलावाची राणी सोनम बछड्यांसोबत दंगामस्ती करताना दिसत आहे. तेलिया तलावाची राणी सोनम ताडोबातील पट्टेदार वाघ प्रख्यात आहेत तशी त्यांच्यातील सत्तासंघर्षाची कहाणीही खास आहे. व्हिडिओत दिसणाऱ्या वाघिणीचं नाव सोनम आहे. तसं तीचं नाव T-24 मात्र तीच्या मानेच्या उजव्या बाजूस S अक्षर असल्याने तीला सोनम म्हणून संबोधतात. सोनामाची आई T-10 अर्थात माधुरीला लारा, मोना, गीता आणि सोनम अशी चार बछडे झाले होते. या 4 बहिणींमध्ये सर्वात वरचढ असलेल्या सोनमने दशकापूर्वी तिची आई टी-10 माधुरीकडून तेलिया तलावाचा प्रदेश हिसकावून घेतला. आज ताडोब्यातील तेलिया तलावावर सोनमचे राज्य आहे.
तेलिया तलावाच्या राज्यासाठी संघर्ष ‘4 सिस्टर्स ऑफ तेलिया’ या नावाने प्रख्यात असलेल्या लारा, मोना, गीता आणि सोनम या T-10 अर्थात माधुरीच्या पोटी जन्माला आलेल्या वाघिणी आहेत. या एका कुटुंबातील वाघिणींनी अनेकदा सोबत असताना दर्शन दिले आहे. कालांतरानं ताडोबातील प्रमुख तेलिया तलावात पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांच्या शिकारीच्या दृष्टीने बहिणींमध्ये सत्तासंघर्ष सुरू झाला. आईसह चार बहिणींमध्ये सोनम सर्वात वरचढ ठरली. बछड्यांसाठी बिबट्याला संपवलं सोनम अतिशय साहसी आणि ताकदवान असून तिने भूतकाळात आपल्या शावकांचे रक्षण करण्यासाठी बिबट्याला देखील मारून टाकले. एकदा तर तिने दुसऱ्या वाघाशी लढताना तिचा डोळा जवळजवळ गमावला होता. आजघडीला तिचे राज्या या तलावावर असून ती आपल्या बछड्यांसोबत मुक्त संचार करत वातावरणातील बदलाचा आनंद घेत आहे. त्यात तिचे बछडे देखील भविष्यात या जंगलचा राजा होण्याचे धडे गिरवत आहेत. Pune News : साप दिसल्यावर किती फूट अंतर दूर उभं राहिलं पाहिजे? विषारी की बिनविषारी कसं ओळखायचं? देशविदेशातील पर्यटकांच्या आवडीचं ठिकाण ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प हा भारतातील एक मुख्य आणि महाराष्ट्रातील सर्वात जुना व मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. जगभरातील वन्यजीव अभ्यासक, पर्यटक वाघांच्या दर्शनासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देत असतात. वाघांच्या व्यतिरिक्त देखील विविध प्राणी पक्षी, वनश्री, निसर्गाचे बहरलेले प्रत्येक मौसमातले रूप येथे येणाऱ्या पर्यटकांना भारवून टाकते. म्हणूनच येथे येणारा पर्यटक कधीही निराश होऊन जात नाही. ताडोबात वाघांच्या संख्या 90 च्या घरात देशभरातील व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापनातील कामगिरीचा अहवाल केंद्र सरकारने जाहीर केला. यात समोर आलेल्या आकडेवारीनुसार देशात वाघांची संख्या 3 हजार 167 वर पोहचली आहे. तर 2022 च्या आकडेवारी नुसार महाराष्ट्रात कमीत कमी वाघांची संख्या ही 390 च्या घरात पोहचली आहे. व्याघ्रगणनेच्या अनुमनानुसर ही संख्या 466 च्या पुढे आहे. त्यात एकट्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कमीत कमी वाघांची संख्या 87 आहे. तर 87-91 वाघ असल्याचा अनुमान आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर वाघांचे अधिवास असल्याने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जगविख्यात आहे. Dog Care : पावसाळ्यात कुत्र्याला गोचिड चिकटू नये म्हणून ‘ही’ सोपी ट्रिक्स करा फॉलो, Video या काळात पर्यटन बंद राहणार ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत पर्यटनासाठी बंद राहणार आहे. त्यामुळे पावसाळ्याचे तीन महिने पर्यंटकांना जंगल सफारीचा आनंद घेता येणार नाही. मात्र बफर झोनची सफारी सुरू राहाणार आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प, कोअर क्षेत्र, बोर व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य येथील जंगल सफारी 9 जुलै 2023 पासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. पर्यटकांना पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात सिल्लारी आणि सुरेवानी पर्यटन गेट येथून मर्यादित स्वरूपात जंगल सफारीची सुविधा ऑफलाईन पध्दतीने उपलब्ध असेल, असे वनविभागाने सांगितले आहे.