जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Dog Care : पावसाळ्यात कुत्र्याला गोचिड चिकटू नये म्हणून ‘ही’ सोपी ट्रिक्स करा फॉलो, Video

Dog Care : पावसाळ्यात कुत्र्याला गोचिड चिकटू नये म्हणून ‘ही’ सोपी ट्रिक्स करा फॉलो, Video

Dog Care : पावसाळ्यात कुत्र्याला गोचिड चिकटू नये म्हणून ‘ही’ सोपी ट्रिक्स करा फॉलो, Video

तुमच्या घरातील कुत्रा आजारी पडू नये यासाठी घरच्याघरी त्याची कशी काळजी घ्यावी हे आम्ही सांगणार आहोत

  • -MIN READ Kalyan-Dombivli,Thane,Maharashtra
  • Last Updated :

डोंबिवली, 10 जुलै :  ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत ते या प्राण्यांना जीवापाड जपतात. हे प्राणी जेव्हा आजारी पडतात तेव्हा त्यांना आपल्या घरतला एक सदस्यच आजारी पडल्यासारखे वाटते. तुमच्या घरातील कुत्रा आजारी पडू नये यासाठी घरच्याघरी त्याची कशी काळजी घ्यावी हे आम्ही सांगणार आहोत. डोंबिवलीतील पॉल संस्थेचे तज्ज्ञ मार्गदर्शक निलेश भणगे यांनी दिली आहे. विशेषत: पावसाळ्यामध्ये गोचिड चिटकू नयेय यासाठीच्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली आहे. निलगिरीच्या तेलाने आंघोळ घालावी… ’ तुमच्या कुत्र्याला गोचीड होऊ नये यासाठी त्याला आठवड्यातून एकदा निलगिरीच्या तेलाने आंघोळ घालावी. गरम पाण्यात निलगिरीच्या तेलाचे दोन थेंब घालावे, असा सल्ला भणगे यांनी दिलीय. अँटी टिक कॉलर ‘कुत्र्याला अँटी टिक कॉलर देखील लावू शकतो. ही कॉलर लावताना श्वान ती कॉलर चाटणार नाही, याकडे त्याच्या मालकाने विशेष लक्ष देणं आवश्यक आहे.

News18लोकमत
News18लोकमत

नो टीक्स साबण ‘मेडिकलच्या दुकानात नो टिक साबण मिळतो. आठवड्यातून एकदा प्राण्यांना आंघोळ घालताना या साबणाचा वापर करू शकतो. हा साबण वापरताना प्राणी हा साबण चाटणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे,’ असा सल्ला भणगे यांनी दिलाय. श्वान पाळणे इतकं सोप्पं नाही, आधी ही माहिती जाणून घ्या पावसाळयातील काळजी ‘पावसाळयात प्राण्यांना गॅस्ट्रो होऊ नये यासाठी त्याला स्वच्छ जागी ठेवणे, वर्षातून एकदा व्हॅक्सीनेशन करणे गरजेचे आहे. पावसाळ्याचे घराबाहेर नेणे कमी करावे.’ घरातील लाडका सदस्य आजारी पडू नये यासाठी प्रत्येक पालक काळजी घेत असतात. या छोट्या छोट्या ट्रिक्स तुम्हाला प्राण्यांची काळजी घ्यायला फायदेशीर ठरू शकतात. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यातही आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घेणे आवश्यक आहे अशी माहिती निलेश भणगे यांनी दिली.

(सूचना : येथे दिलेली माहिती तज्ज्ञांचं वैयक्तिक मत आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात