जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Pune News : साप दिसल्यावर किती फूट अंतर दूर उभं राहिलं पाहिजे? विषारी की बिनविषारी कसं ओळखायचं?

Pune News : साप दिसल्यावर किती फूट अंतर दूर उभं राहिलं पाहिजे? विषारी की बिनविषारी कसं ओळखायचं?

Pune News : साप दिसल्यावर किती फूट अंतर दूर उभं राहिलं पाहिजे? विषारी की बिनविषारी कसं ओळखायचं?

पावसाळ्यात साप बिळाबाहेर पडतात. घरामध्ये किंवा अंगणात साप दिसला तर काय करावं?

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 10 जुलै :  पावसाळ्यात कडक उन्हापासून दिलासा मिळतो. त्याचबरोबर या कालावधीमध्ये सापांचा धोकाही वाढतो. पावसाळा सुरू होताच शहर आणि ग्रामीण भागात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ झालीय. पावसाचे पाणी सापाच्या बिळांमध्ये साठते आणि ते सुरक्षित जागा शोधण्यासाठी घराच्या बाहेर पडतो. घरामध्ये किंवा अंगणात साप दिसला तर काय करावं? याबाबत पुण्यातील सर्पमित्र गणेश माने यांनी महत्त्वाची माहिती दिलीय. पावसाळ्यामध्ये गवत वाढल्यानं पाली, सरडे, किडे बाहेर पडतात. किटकांना खाण्यासाठी बेडूक तर बेडकांना खाण्यासाठी साप येतात. हे निसर्गचक्र सुरू असतं. पुणे आणि परिसरात आढळणाऱ्या सापांमध्ये चार प्रमुख विषारी साप आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

नाग, घोणस मण्यार आणि फुरसे हे प्रमुख चार विषारी साप पाषाण, कोथरूडम अशा पुण्यातील प्रमुख परिसरात आढळतात. बिनविषारी सापांमध्ये नाणेती, धामण, तस्कर, कवड्या, गवत्या, कुकरी, तेवड किंवा विरोळा, खापर खवल्या, मांडूळ, रसेल, कुकरी, वाळा, अरणटोळा आणि काळकोंड्या यांचा समावेश आहे. पुण्यात आढळतात हे 2 साप, विषारी की बिनविषारी? पुणेकरांनो, हा Video पाहाच! साप दिसल्यानंतर अनेकदा लोकं पॅनिक होतात. त्यांचे फोटो काढतात किंवा त्यांना विनाकारण त्रास देतात. त्यावेळी सर्पमित्रांना फोन करावा. सर्पमित्र तुम्हाला सापाचा फोटो किंवा व्हिडिओ काढायला सांगतात. त्यामधून तो साप विषारी आहे की बिनविषारी याची माहिती मिळू शकते. सापापासून किमान 15 ते 20 फुटांचा अंतर राखून ठेवावे. हे अंतर राखून ठेवलं, तर सापाला भीती वाटणार नाही. त्यामुळे तुम्ही सापाला घाबरणार नाही. त्याचबरोबर साप दिसल्यानंतर त्या भागात गर्दी करू नये. तसं झालं तर सापाला भीती वाटणार नाही. त्याला कंट्रोल करणे आवश्यक आहे, असा सल्ला माने यांनी दिलाय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18 , Pune , Snake
  • First Published :
जाहिरात
जाहिरात