जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सावधान! नागपुरात पहिल्यांदाच वाढतोय हत्तीरोग, पाहा काय आहेत लक्षणं? Video

सावधान! नागपुरात पहिल्यांदाच वाढतोय हत्तीरोग, पाहा काय आहेत लक्षणं? Video

सावधान! नागपुरात पहिल्यांदाच वाढतोय हत्तीरोग, पाहा काय आहेत लक्षणं? Video

Elephantiasis : नागपूरमध्ये गेल्या चार वर्षात सर्वाधिक हत्तीरोगाचे पेशंट्स आढळले आहेत. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.

  • -MIN READ Nagpur,Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

    नागपूर,  28 सप्टेंबर : नागपूर शहरात पहिल्यांदा हत्तीरोग आजार पूर्ण विकसित झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. महापालिकेने केलेल्या पाहणीत पूर्ण विकसित आठ रुग्ण सापडले आहेत. त्यात 4 पुरुष तर 4 महिलांचा समावेश आहे. सोबतच अंडवृध्दीचे 4 रुग्ण देखील आढळले आहेत. गेल्या चार वर्षांत इतके रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. मनपाच्या आरोग्य विभागामार्फत पाहणी करण्यात आली होती. पाहणीनुसार यापूर्वी 33 जणांच्या रक्तामध्ये हत्तीरोगाचे जंतू आढळले होते. या आजारावर कोणताही परिणामकारक उपाय नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून औषधांचे सेवन करणे आणि संबंधित डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. हत्तीरोगाचे लक्षणे हत्तीरोगाची तशी किरकोळ लक्षणे दिसून येतात. थंडी वाजून येणे, ताप येणे, पाय दुखून येणे, वृषण आकाराने जाड होणे, दोन्ही पाय हत्तीच्या पायांसारखे जाड व मोठे होणे, हालचाल करण्यास अवघड होणे. थंडी ताप किंवा वरील इतर लक्षणे दिसून आल्याबरोबर लवकरच लवकर रक्त तपासणी करून हत्तीरोग चाचणी करून घ्यावी. रक्त तपासणीत हत्तीरोग दूषित रुग्ण आढळल्यास हत्तीरोग रुग्णाने डॉक्टरांना भेटून त्यांच्या सल्ल्यानेच संपूर्ण उपचार घेणे आवश्यक आहे. तेव्हाच या रोगांचे नियंत्रण होऊ शकते. लक्षणे दिसायला 8 ते 16 महिने हत्तीरोग आजार हा डासांपासून होणारा आजार आहे. डासांमार्फत जंतू शरीरात शिरल्यानंतर हत्तीरोग आजाराची लक्षणे दिसायला 8 ते 16 महिने एवढा कालावधी लागतो. या आजारामध्ये रुग्णांचे पाय, वृषण हे आकाराने जाड होतात. रुग्णास हालचाल करणेही अवघड होऊन बसते. हत्तीरोग हा शरीर विद्रूप करून अकार्यक्षम करणारा रोग असून सामान्यतः तो लहानपणात होतो. हत्तीरोग हा “क्युलेक्स विचकि फॅसिएटस’ नावाचा अळ्या ज्यांना मायक्रोफिलेरिई असे म्हणतात त्यामुळे होतो. या अळ्या डासांच्या चाव्याद्वारे पसरतात.   Satara : लम्पी आजाराचा बैलगाडा शर्यतीवर परिणाम, लाखोंचं नुकसान होण्याची भीती Video देशात राष्ट्रीय स्तरांवर हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालये, शासकीय संस्था वगैरेंमधून राबविण्यात येतो. भारतात हा रोग प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा, तमिळनाडू, केरळ, मध्यप्रदेश, आसाम, कर्नाटक इत्यादी राज्यात आढळतो. महाराष्ट्रात वर्धा येथे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे. मुलांमध्ये पसरतोय HMFD आजार, पाहा काय आहेत लक्षणं आणि उपाय Video शहरातील उच्चभ्रू वस्तीत देखील रुग्ण हत्तीरोग रोग झाल्यास काळजी घेण्यासाठी म्हणून मनपा प्रशासनाच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. हत्तीरोग विकृती व्यवस्थापन केंद्र प्रत्येक आरोग्य विभागातील केंद्रावर उभारण्यात येणार आहे.  त्याकरिता संबंधित वैद्यकीय अधिकारी, आशा कामगार यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ज्यांच्यात हा आजार विकसित झाला आहे किंवा लक्षणे आढळून आली आहेत त्यांना या कक्षामुळे फायदा होऊ शकेल. हत्तीरोग हा आजार कुणालाही होऊ शकतो, शहरातील उच्चभ्रू वस्तीत देखील या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत.  

    अंधश्रद्धा न बाळगता योग्य उपचार घ्या आजाराबाबत सजग राहून अशी लक्षणं आढळून आल्यास कुठल्याही निष्काळजी किंवा अंधश्रद्धा न बाळगता जवळच्या हत्तीरोग निदान केंद्रात जाऊन उपचार घावे, तसेच हत्ती रोग निदानासाठी रक्त तपासणी केली जाते. या रक्त तपासणीद्वारे रक्तात परजीवी उपस्थित आहे की नाही हे तपासले जाते. हत्तीरोग जंतूच्या विशिष्ट सवयीमुळे हे जंतू मानवी रक्तात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे रात्री नऊ ते बारा दरम्यान रक्त नमुना घेऊन तपासणी केल्यास या रोगाचे निदान होऊ शकते. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मोहिमेला सहकार्य करण्याचे आव्हान मनपाच्या हत्तीरोग अधिकारी डॉ. जास्मिन मुलानी यांनी केले आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात