मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Satara : लम्पी आजाराचा बैलगाडा शर्यतीवर परिणाम, लाखोंचं नुकसान होण्याची भीती Video

Satara : लम्पी आजाराचा बैलगाडा शर्यतीवर परिणाम, लाखोंचं नुकसान होण्याची भीती Video

जनावरांच्या शर्यती, बाजार आणि प्रदर्शनाला बंदी घालण्यात आली आहे. लसीकरण झालेल्या बैलांना शर्यतीमध्ये भाग परवानगी देण्याची मागणी बैलगाडा प्रेमींनी केली.

जनावरांच्या शर्यती, बाजार आणि प्रदर्शनाला बंदी घालण्यात आली आहे. लसीकरण झालेल्या बैलांना शर्यतीमध्ये भाग परवानगी देण्याची मागणी बैलगाडा प्रेमींनी केली.

जनावरांच्या शर्यती, बाजार आणि प्रदर्शनाला बंदी घालण्यात आली आहे. लसीकरण झालेल्या बैलांना शर्यतीमध्ये भाग परवानगी देण्याची मागणी बैलगाडा प्रेमींनी केली.

सातारा, 23 सप्टेंबर : जनावरांमधील लम्पी रोगाने भयावह रूप धारण केले आहे. काही जनावरे दगावली देखील आहेत. मोठ्या प्रमाणात पशुधनामध्ये आजार फैलावत चालल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. जिल्ह्यातील जनावरांच्या शर्यती, बाजार आणि प्रदर्शनाला बंदी घालण्यात आली आहे. मात्र, अटी शर्तीच्या आधारे शर्यतींना परवानगी द्यावी, अशी मागणी बैलगाडा प्रेमी करत आहेत. सातारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सद्यःस्थितीत गाय व बैल यांना लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. आजार नियंत्रणासाठी जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जनावरांच्या वाहतुकीवर मनाई आदेश लागू केला आहे. आदेशानुसार शेतकऱ्यांना बाहेरच्या जिल्ह्यातून तसेच राज्यातून पशुधन खरेदी करणे व जनावरांची वाहतूक करण्यास मनाई आहे. तसेच प्राण्यांच्या शर्यतीवरती देखील बंदी घातली आहे. जिल्ह्याबरोबरच लगतच्या जिल्ह्यांमध्येही लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झालेला असल्याने जिल्ह्यातील जनावरांचे सर्व आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. Video : शेतकऱ्यांच्या कामात घोणस अळीचा अडथळा, विषारी दंश झाला तर लगेच करा 'हे' उपाय जिल्ह्यातील इतर आठवडी बाजारांमध्येही जनावरांची खरेदी-विक्री व प्रदर्शन होत असल्यास, त्यालाही मनाई केली आहे. या आदेशाची अंमलबजावणी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, पोलीस अधीक्षक, स्थानिक स्वराज्य संस्था, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व सर्व आनुषंगिक प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी काटेकोरपणे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  दिलेली परवानगी नाकारली जिल्ह्यातील काही गावांमध्ये बैलगाडा शर्यत भरवण्यात यावे या मागणीचा प्रस्ताव बैलगाडा प्रेमींनी प्रांताधिकारी यांच्याकडे दिला होता. यावरती प्रांत अधिकारी यांनी आदेश प्राप्त होण्याच्या आधी परवानगी आदेश दिले होते. ते आदेश देखील पत्र देऊन थांबवण्यात आले आहेत व पुढील आदेश येईपर्यंत संबंधित बैलगाडा शर्यत व बैल बाजार थांबवण्याचे लेखी पत्र संबंधित बैलगाडा मालक आयोजक यांना प्रांत अधिकाऱ्यांनी दिले आहेत.  'लम्पी'मध्ये खासगी डॉक्टरांचे फावले, शेतकऱ्यांची सुरू आहे लूट! पाहा Video लसीकरण झालेल्या बैलांना परवानगी द्या लसीकरण झालेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी व परवानगी देण्यासाठीची मागणी बैलगाडा प्रेमींनी केली आहे. बैलांना रोज फेरी मारणे तसेच स्पर्धेमध्ये पळवणे हे गरजेचे आहे. अन्यथा आमचे लाखो रुपयांचे बैल या सगळ्या गोष्टी विसरून जाऊ शकतात. यामुळे बैलांची किंमत कमी होऊ शकते. यासाठी प्रशासनाने लक्ष देऊन लसीकरण झालेल्या जनावरांना स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र करावे. अटी शर्तीच्या आधारे शर्यतींना परवानगी द्यावी, अशी मागणी बैलगाडा प्रेमी करत आहेत.
First published:

Tags: Satara, Satara news, सातारा

पुढील बातम्या