मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सावधान! मुलांमध्ये पसरतोय HMFD आजार, पाहा काय आहेत लक्षणं आणि उपाय Video

सावधान! मुलांमध्ये पसरतोय HMFD आजार, पाहा काय आहेत लक्षणं आणि उपाय Video

Nagpur : कमी वयाच्या मुलांमध्ये एचएफएमडी आजाराचे संक्रमण होत आहे. त्यामुळे या मुलांची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

Nagpur : कमी वयाच्या मुलांमध्ये एचएफएमडी आजाराचे संक्रमण होत आहे. त्यामुळे या मुलांची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

Nagpur : कमी वयाच्या मुलांमध्ये एचएफएमडी आजाराचे संक्रमण होत आहे. त्यामुळे या मुलांची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

नागपूर, 23 सप्टेंबर : गोवंशीय प्राण्यांमधील लम्पी त्वचा विकारामुळे शेतकरी धास्तावले आहेत. अशातच शहरात एका नव्या रोगाने तोंड वर काढले आहे. शहरांतील अनेक लहान मुलांमध्ये हॅण्ड, फूट, माऊथ डिसिज (एचएफएमडी) ची लागण झाल्याचे आढळले आहे. कांजण्यासदृश्य फोड आणि लक्षणे दिसत असल्याने पालकांमध्ये संभ्रम आहे. या आजाराचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होत असल्याने लहानमुलांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. काय आहेत आजाराची लक्षणे? विशिष्ट प्रकारच्या विषाणूमुळे एचएफएमडी आजार होतो. यात हात, पाय तसेच तोंडाला पुरळ येतात. लाळ, खोकला, विष्ठा, शिंका याद्वारे या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. तसा हा आजार कुठल्याही वयात होतो. मात्र, लहान मुलांमध्ये तो विशेषत्वाने आढळतो. साधारणतः आठ ते दहा दिवसात शरीरावरील पुरळ व चट्टे आपोआप निघून जातात. मात्र, संसर्ग झाल्यानंतर तीन ते सहा दिवसात आजाराची लक्षणे दिसायला लागतात.  'लम्पी'मध्ये खासगी डॉक्टरांचे फावले, शेतकऱ्यांची सुरू आहे लूट! पाहा Video तोंडात देखील फोड शरीरावरील घशात दुखणे, डोकेदुखी अशासारखी लक्षणे आढळतात तसेच ताप आणि घशात त्रास होतो. ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. बरेचदा तळहातावरील लाल पुरळ दिसतात. एचएफएमडी झालेल्या मुलांच्या तोंडात देखील फोड येतात. एकदा आजार झाला की संबंधित प्रतिकारशक्ती तयार होते. त्यामुळे दहा वर्षाच्या पुढील वयोगटात आजारांचे रुग्ण क्वचित आढळतात. मात्र, प्रतिकारशक्ती कमी असेल तर अशांना सुद्धा बाधा होऊ शकते. बचावासाठी काय काळजी घ्यावी? एचएफएमडी आजारामुळे तोंडाला फोड आले की पाणी किंवा अन्य द्रव्य पिताना त्रास होतो. त्यामुळे शरीरात पाणी जाण्याचे प्रमाण घटू शकते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नये. द्रव्य पदार्थांचे सेवन करावे. लहान मुलांमध्ये संसर्ग होऊ नये म्हणून आजार झालेल्या मुलांना वेगळे ठेवावे. त्यांचे कपडे, वापरायची भांडी वेगळी ठेवावीत. रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून त्यांना शाळेत पाठवू नये. Video : शेतकऱ्यांच्या कामात घोणस अळीचा अडथळा, विषारी दंश झाला तर लगेच करा 'हे' उपाय घाबरू नका डाॅक्टरांचा सल्ला घ्या एचएफएमडी रोग टाळण्यासाठी शाळेत किंवा घरी आल्यानंतरही मुलांना साबण, गरम पाण्याने हात स्वच्छ धुवायला सांगा. आपले हात किंवा अन्य वस्तू तोंडाजवळ नेऊ नये. या रॊगासंबंधित कुठलीही लक्षणे आढळून आल्यास घाबरून न जाता डॉक्टरचा सल्ला घ्यावा, असे मत बालरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांनी व्यक्त केले.
First published:

Tags: Nagpur, Nagpur News, नागपूर

पुढील बातम्या