,नागपूर, 14 जुलै : नागपूरमध्ये गँगवॉरच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी एका कुख्यात गुंडाचा खून करण्यात आला होता ही घटना ताजी असतानाच काल रात्री नागपुरात शहराच्या महत्वाच्या ठिकाणी कुख्यात गुंड शेखू खान याचा भाऊ शाहरुख खान याचा खून करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान खुनाच्या घटनांमुळे नागपुरात कायदा सुव्यवस्थेच प्रश्न उपस्थित झाला आहे. (Nagpur Murder of a Gangster)
नागपुर शहरातील शंकरनगर परिसरात रात्री 11 च्या सुमारास कुख्यात गुंड शेखू खानचा भाऊ शाहरूख आपल्या वाहनात पेट्रोल टाकण्यासाठी गेला होता. यावेळी त्याची हत्या करण्यात आली. दरम्यान काहींनी अडवण्याचा प्रयत्न केला परंतु हल्लेखोरांनी शाहरुखचा खून करून पळून गेले. शंकरनगर परिसरात घडलेल्या घटनेने शंकरनगर परिसरात खळबळ माजली होती.
हे ही वाचा : Bhandara Accident : भंडाऱ्यात भर पावसात भीषण अपघात, सुसाट बस-ट्रकवर आदळली, दोघांचा जागीच मृत्यू
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री 11 च्या सुमारास घडली. शाहरुख शंकर नगर पेट्रोलपंपावर त्याच्या वाहनामध्ये पेट्रोल टाकण्यासाठी आला होता. दरम्यान काही काही हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून जागीच ठार केले. पोलिसांच्या माहितीनुसार काचीपुरा येथील काही तरुणांचा सहभाग असल्याचा संशय आहे. या घटनेने शंकरनगर परिसरात खळबळ उडाली आहे. डीसीपी लोहित मतानी आणि बजाज नगर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.
याचबरोबर हत्या केल्यानंतर आरोपींनी परिसरातील सीसीटीव्हीची तोडफोड केली. दरम्यान घटनास्थळावर असलेल्या नागरिकांनी हल्ला केलेल्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला पंरतु गुंडांनी त्यांनाही मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. मृतक हा कुख्यात गुंड शेफु खान याचा भाऊ असून गॅंगवार मधून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
हे ही वाचा : Kolhapur Pavankhind : पावनखिंडवर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना शिवभक्तांनी चांगलाच चोपला Video Viral
आरोपी हे हत्येच्या उद्देशाने शेफु खानच्या भावाच्या मागावर होते. सुरुवातीला खानच्या वाहनाला धडक दिली. यानंतर अपघाताचा बनाव करत वाद घातला व त्यानंतर सुनियोजित पद्धतीने हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे.