Home /News /maharashtra /

Kolhapur Pavankhind : पावनखिंडवर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना शिवभक्तांनी चांगलाच चोपला Video Viral

Kolhapur Pavankhind : पावनखिंडवर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना शिवभक्तांनी चांगलाच चोपला Video Viral

महाराष्ट्रात काल (दि.13) पावनखिंड (Kolhapur pavankhind) रणसंग्राम दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यासाठी हजारो शिवप्रेमी विशाळगड आणि पावनखिंडला भेट देण्यासाठी गेले होते.

  कोल्हापूर, 14 जुलै : महाराष्ट्रात काल (दि.13) पावनखिंड (Kolhapur pavankhind) रणसंग्राम दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यासाठी हजारो शिवप्रेमी विशाळगड आणि पावनखिंडला भेट देण्यासाठी गेले होते. दरम्यान पावनखिंडला गेलेल्या काही पर्यटकांमधील तरुणांनी मद्यपान करून आल्याने त्यांना शिवभक्तांनी चांगलाच चोप दिल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हे मद्यपी मद्यपान करून पावनखिंड ठिकाणी धिंगाणा घालत असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांना शिवभक्तांनी पकडून जाब विचारत चांगलाच चोप दिला.

  कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा आणि शाहूवाडी या दोन तालुक्यामध्ये असणाऱ्या पावनखिंडमध्ये शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या पाऊलखुणा आहेत. सिद्दीच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी पावनखिंडीतून शिवराय विशाळगडावर पोहोचले होते यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद यांच्यासारख्या अनेक मावळ्यांनी बलिदान दिल्याने पावनखिंडीत प्रत्येक वर्षी रणसंग्राम दिवस साजरा केला जातो. दरम्यान काही मद्यपी मद्यपान करून पवित्र स्थानाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असल्याने मद्यपींना शिवभक्तांनी चांगलाच चोप दिला.

  हे ही वाचा : नको ते धाडस करू नका! पूर पाहण्यास गेले अन् 5 तरुण नाल्यात वाहून गेले

  या व्हिडीओमध्ये शिवभक्तांनी चांगलीच धुलाई केल्याचे दिसून येत आहे. काही शिवभक्त लाथाबुक्यांनी मद्यपींना मारत असल्याचे स्पष्ट व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. काल झालेल्या रणसंग्राम दिवशी हजारो शिवभक्त वंदन करण्यासाठी येतात परंतु काही मद्यपी येथे आल्याने शिवप्रेमींना संताप अनावर झाल्याने मद्यपींना चांगलीच अद्दल घडवल्याचे बोलले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा आणि विशाळगडावर असे वारंवार प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे. काल झालेल्या घटनेत मद्यपींना कान पकडून माफी मागावी लावल्यानंतर प्रकरण शांत झाले.

  हे ही वाचा : महाविकास आघाडीत बिघाडी, उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न, मिलिंद देवरा यांचा गंभीर आरोप

  विर शिवा काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाने पावन झालेल्या भूमिला पावनखिंड असे नाव देण्यात आले. शिवरायांना सिद्दीच्या तावडीतून सोडवण्यासाठी कित्येक मावळ्यांनी आपल्या छातीची ढाल करून पावनखिंडीत पोर्णिमेच्या रात्री लढाईकरून पावनखिंडीतून विशाळगडावर पोहोचवले. या पावन भूमीवर मद्यपींनी धिंगाणा घातल्याने शिवभक्त आक्रमक झाले होते.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Chhatrapati shivaji maharaj, Kolhapur, Maharashtra News

  पुढील बातम्या