मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /MLC election result : नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे विजयी; भाजपने गड राखला, काँग्रेसची खेळी फसली

MLC election result : नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे विजयी; भाजपने गड राखला, काँग्रेसची खेळी फसली

Nagpur MLC election: नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजय मिळवला आहे.

Nagpur MLC election: नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजय मिळवला आहे.

Nagpur MLC election: नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजय मिळवला आहे.

नागपूर, 14 डिसेंबर : नागपूर विधान परिषद निवडणुकीत (Nagpur MLC election result) नाट्यमय घडामोडीनंतर भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. तर काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मते मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 मते मिळाली आहेत. (BJP Chandrashekhar Bavankule wins Nagpur MLC election)

विधान परिषदेच्या नागपूर येथील जागेवर चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मते मिळाली आहेत. त्यांनी या निवडणुकीत तब्बल 176 मतांनी विजय मिळवला आहे. काँग्रेसने मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना उमेदवार बदलल्याने त्याचा फटका काँग्रेसला बसला असल्याचं बोललं जात आहे.

मतमोजणीत 549 मते वैध ठरली. विजयी उमेदवारासाठी 275 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना 362, रवींद्र भोयर यांना 1, मंगेश देशमुख यांना 186 मते प्राप्त झाली.महाविकास आघाडीची 16 मते फुटली तर भाजपला 44 अतिरिक्त मते मिळाली त्यामुळे काँग्रेससाठी ही मोठी चपराक आहे.

वाचा : Akola MLC election result: मविआची मते फुटली अन् भाजपने निवडणूक जिंकली

कुठल्या उमेदवाराला किती मते? 

चंद्रशेखर बावनकुळे 362

मंगेश देशमुख 186

छोटू भोयर 1

अवैध 5

विधान परिषदेच्या नागपूर येथील जागेच्या निकालाकडे सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या. कारण, या जागी मतमोजणीच्या अवघ्या काही तासांपूर्वी काँग्रेसने आपल्या उमेदवाराला सोडून अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. काँग्रेसने शेवटला क्षणाला आपले अधिकृत उमेदवार रवींद्र भोयर यांना बाजूला करून अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन दिले त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढली. या निवडणुकीत भाजपने चंद्रशेखर बाबनकुळे यांना उमेदवारी दिली होती.

भाजपच्या उमेदवाराचा झालेला हा विजय म्हणजे काँग्रेसला एक मोठा फटका बसला आहे. तसं पहायला गेलं तर नागपुरात भाजपच्या सदस्यांची संख्या अधिक होती पण काँग्रेसने भाजपच्याच छोटू भोयर यांना गळाला लावत तिकीट दिलं आणि त्यानंतर अखेरच्या क्षणी छोटू भोयर यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना आपला अधिकृत उमेदवार जाहीर केलं. यामुळे काँग्रेस पक्षातील अंतर्गत नाराजी आणि गटबाजीही या पराभवाला कारणीभूत ठरल्याचं बोललं जात आहे.

मतांचा विचार केला तर भाजपकडे एकूण 316 मते होती असे असले तरी चंद्रशेखर बावनकुळे यांना तब्बल 362 मते मिळाली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सदस्यांनी काँग्रेस उमेदवाराने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला मतदान केलं नसल्याचं बोललं जात आहे.

नागपुरातील स्थिती

एकूण मतदार - 559

महानगरपालिका - 155 सदस्य

जिल्हा परिषद - 70 सदस्य

नगरपरिषद आणि नगरपंचायत - 334 सदस्य

नागपुरातील पक्षीय बलाबल

भाजप - 316

काँग्रेस 150

राष्ट्रवादी काँग्रेस - 24

शिवसेना - 28

बसपा - 12

शेकाप - 5

स्थानिक गट - 7

अपक्ष - 17

First published:

Tags: BJP, Election, Nagpur