Home /News /nagpur /

MLC election result live updates: नागपुरात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे तर अकोल्यात भाजपच्या वसंत खंडेलवाल यांचा विजय

MLC election result live updates: नागपुरात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे तर अकोल्यात भाजपच्या वसंत खंडेलवाल यांचा विजय

Nagpur, Akola Buldhana washim MLC election 2021 result: विधान परिषदेच्या नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलढाणा येथील विधान परिषदेच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी.

    नागपूर, 14 डिसेंबर : राज्यातील विधान परिषदेच्या नागपूर (Nagpur MLC) आणि अकोला-वाशिम-बुलढाणा (Akola Washim Buldhana MLC) येथील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीची आज मतमोजणी (MLC election counting) होत आहे. विधान परिषदेच्या या दोन्ही जागांवर 10 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. तर आज मतमोजणी पार पडली आहे. राज्यातील एकूण सहा जागांसाठी ही निवडणूक होणार होती त्यापैकी चार जागांवर निवडणूक ही बिनविरोध झाली होती. नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलढाणा या दोन्ही जागांवर भाजप उमेदवारांनी विजय मिळवला आहे. MLC Election Live updates अकोल्यात भाजपचे वसंत खंडेलवाल विजयी अकोल्याची जागाही भाजपने जिंकली चंद्रशेखर बावनकुळे 176 मतांनी विजयी, अधिकृत घोषणा बाकी नागपुरात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विजयी नागपुरात पहिल्या फेरीत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आघाडीवर नागपुरमध्ये काय स्थिती? विधान परिषदेच्या नागपूर येथील जागेच्या निकालाकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत. कारण, या जागी मतमोजणीच्या अवघ्या काही तासांपूर्वी काँग्रेसने आपल्या उमेदवाराला सोडून अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. काँग्रेसने शेवटला क्षणाला आपले अधिकृत उमेदवार रवींद्र भोयर यांना बाजूला करून अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन दिले त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढली. या निवडणुकीत भाजपने चंद्रशेखर बाबनकुळे यांना उमेदवारी दिली होती. नागपुरातील स्थिती एकूण मतदार - 559 महानगरपालिका - 155 सदस्य जिल्हा परिषद - 70 सदस्य नगरपरिषद आणि नगरपंचायत - 334 सदस्य वाचा : Kolhapur MLC Election: काँग्रेसचे सतेज पाटील बिनविरोध नागपुरातील पक्षीय बलाबल भाजप - 316 काँग्रेस 150 राष्ट्रवादी काँग्रेस - 24 शिवसेना - 28 बसपा - 12 शेकाप - 5 स्थानिक गट - 7 अपक्ष - 17 वाचा : Mumbai MLC Election: मुंबईची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध  अकोला-वाशिम-बुलढाण्यात काय स्थिती? विधान परिषदेच्या अकोला-वाशिम-बुलढाणा जागेवर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे गोपिकिशन बजोरिया यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपकडून वसंत खंडेलवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. अकोला-वाशिम-बुलढाण्यातील पक्षीय बलाबल एकूण मतदार - 822 भाजप - 254 काँग्रेस - 191 शिवसेना - 124 राष्ट्रवादी काँग्रेस 91 जिल्हानिहाय मतदार अकोला - 287 वाशीम  - 168 बुलढाणा - 367 अकोला जिल्हा  जिल्हा परिषद - 60 मतदार, महानगरपालिका- 81 मतदार, अकोट नगरपरिषद- 36, तेल्हारा नगरपरिषद- 19, बाळापूर नगरपरिषद- 26, पातूर नगरपरिषद- 19, मूर्तिजापूर नगरपरिषद- 26, बार्शीटाकळी नगरपंचायत- 20. वाशिम जिल्हा जिल्हा परिषद- 58, नगरपरिषद वाशिम- 34, नगर परिषद कारंजा- 32, नगर परिषद मंगरुळ्पीर- 21, नगरपरिषद रिसोड- 23. बुलढाणा जिल्हा जिल्हा परिषद बुलढाणा- 71, नगरपरिषद बुलढाणा- 31, नगर परिषद चिखली- 30, नगर परिषद देऊळगाव राजा- 21, नगर परिषद सिंदखेड- 19, नगर परिषद लोणार- 20, नगर परिषद मेहकर- 27, नगर परिषद खामगाव- 37, नगर परिषद शेगाव- 32, नगर परिषद जळगाव जामोद- 21, नगर परिषद नांदुरा- 26, नगर परिषद मलकापूर- 32.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Akola, Buldhana news, Election, Nagpur, Washim

    पुढील बातम्या