Home /News /maharashtra /

MLC election result: अकोल्यात शिवसेनेला मोठा झटका, भाजपचे वसंत खंडेलवाल विजयी

MLC election result: अकोल्यात शिवसेनेला मोठा झटका, भाजपचे वसंत खंडेलवाल विजयी

Akola washim buldhana MLC election result: भाजप उमेदवार वसंत खंडेलवाल यांचा अकोला-वाशिम-बुलढाणा विधान परिषद निवडणुकीत विजय झाला आहे.

अकोला, 14 डिसेंबर : विधान परिषदेच्या अकोला - वाशिम - बुलढाणा या जागेचा निकाल (Akola Washim Buldhana MLC Election result) हाती आला आहे. या जागेवर भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांचा दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल (Vasant Khandelwal) यांनी शिवसेनेचे गोपिकिशन बजोरिया यांचा पराभव केला आहे. (BJP candidate Vasant Khandelwal wins Akola Washim Buldhana MLC Election 2021) मविआची मते फुटली वसंत खंडेलवाल यांना 443 मते मिळाली आहेत तर गोपिकिशन बजोरिया यांना 334 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे वसंत खंडेलवाल यांचा दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीची जवळपास मते फुटली असल्याचं दिसत आहे. भाजप उमेदवार वसंत खंडेलवाल यांनी ही निवडणूक 109 मतांनी जिंकली आहे. या निवडणुकीत 31 मते अवैध ठरली आहेत. कुणाला किती मते मिळाली?  भाजप उमेदवार - 443 मते शिवसेना उमेदवार - 334 मते वैध मते - 777 बाद मते - 31 विजयी मतांचा फरक - 109 वाचा : नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे विजयी; भाजपने गड राखला, काँग्रेसची खेळी फसली अकोला-वाशिम-बुलढाण्यातील पक्षीय बलाबल एकूण मतदार - 822 भाजप - 254 काँग्रेस - 191 शिवसेना - 124 राष्ट्रवादी काँग्रेस 91 जिल्हानिहाय मतदार अकोला - 287 वाशीम - 168 बुलढाणा - 367 अकोला जिल्हा जिल्हा परिषद - 60 मतदार, महानगरपालिका- 81 मतदार, अकोट नगरपरिषद- 36, तेल्हारा नगरपरिषद- 19, बाळापूर नगरपरिषद- 26, पातूर नगरपरिषद- 19, मूर्तिजापूर नगरपरिषद- 26, बार्शीटाकळी नगरपंचायत- 20. वाशिम जिल्हा जिल्हा परिषद- 58, नगरपरिषद वाशिम- 34, नगर परिषद कारंजा- 32, नगर परिषद मंगरुळ्पीर- 21, नगरपरिषद रिसोड- 23. बुलढाणा जिल्हा जिल्हा परिषद बुलढाणा- 71, नगरपरिषद बुलढाणा- 31, नगर परिषद चिखली- 30, नगर परिषद देऊळगाव राजा- 21, नगर परिषद सिंदखेड- 19, नगर परिषद लोणार- 20, नगर परिषद मेहकर- 27, नगर परिषद खामगाव- 37, नगर परिषद शेगाव- 32, नगर परिषद जळगाव जामोद- 21, नगर परिषद नांदुरा- 26, नगर परिषद मलकापूर- 32. नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे विजयी नागपूर विधान परिषद निवडणुकीत (Nagpur MLC election result) नाट्यमय घडामोडीनंतर भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. तर काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मते मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 मते मिळाली आहेत. मतमोजणीत 549 मते वैध ठरली. विजयी उमेदवारासाठी 275 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना 362, रवींद्र भोयर यांना 1, मंगेश देशमुख यांना 186 मते प्राप्त झाली.महाविकास आघाडीची 16 मते फुटली तर भाजपला 44 अतिरिक्त मते मिळाली त्यामुळे काँग्रेससाठी ही मोठी चपराक आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Election

पुढील बातम्या