मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Satara : 'लम्पी'मध्ये खासगी डॉक्टरांचे फावले, शेतकऱ्यांची सुरू आहे लूट! पाहा Video

Satara : 'लम्पी'मध्ये खासगी डॉक्टरांचे फावले, शेतकऱ्यांची सुरू आहे लूट! पाहा Video

Lumpi : लम्पी व्हायरसमुळे शेतकऱ्यांमध्ये पसरलेल्या भीतीचा फायदा खासगी डॉक्टर घेत आहेत. ते शेतकऱ्यांची लूट करत आहेत.

Lumpi : लम्पी व्हायरसमुळे शेतकऱ्यांमध्ये पसरलेल्या भीतीचा फायदा खासगी डॉक्टर घेत आहेत. ते शेतकऱ्यांची लूट करत आहेत.

Lumpi : लम्पी व्हायरसमुळे शेतकऱ्यांमध्ये पसरलेल्या भीतीचा फायदा खासगी डॉक्टर घेत आहेत. ते शेतकऱ्यांची लूट करत आहेत.

    सातारा, 23 सप्टेंबर : जनावरांमधील लम्पी चर्मरोगाने भयावह रूप धारण केले आहे. काही जनावरे दगावली देखील आहेत. मोठ्या प्रमाणात पशुधनामध्ये आजार फैलावत चालल्याने शेतकरी हादरला आहे. लसीकरणाने वेग घेतला असला, तरी साथ अजून आटोक्यात आलेली नाही. अशातच खासगी डॉक्टरकडून शेतकऱ्यांची लूट होत आहे. एका लसीकरणासाठी 100 ते 200 रुपये आकारले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लंपी व्हायरसची लागण जनावरांना झाली आहे. प्रशासनाच्या वतीने लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र, अद्याप ज्या ठिकाणी मोहीम राबविली गेली नाही त्याठिकाणी खाजगी डॉक्टरांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू आहे. एका लसीकरणासाठी 100 ते 200 रुपये आकारले जात आहेत. याकडे पशुसंवर्धन विभागाने लक्ष देऊन शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्ह्यातील मुख्य शहर वगळता तालुक्यात ग्रामीण भाग येतो. वाड्या, वस्त्या भागातील शेतकरी दुग्ध व्यवसायावर उदरनिर्वाह चालवतो. प्रशासनाने लसीकरणासाठी कंबर कसली असतानाच जिल्ह्यातील खाजगी डॉक्टर आपला आर्थिक फायदा करण्यासाठी शेतकरी वर्गाकडून अधिकचे पैसे घेत आहेत. यामुळे शेतकरी वर्गात मोठी नाराजी पसरली आहे. 600 ते 700 रुपयांना प्रमानी बल्ब औषधांची बाटली मिळते. यात 33 ते 35 जनावरांचे लसीकरण होते. यानुसार एका लसीकरणासाठी 25 ते 30 रुपये खर्च येतो. परंतु, खासगी डॉक्टर शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत मागणी करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. लम्पी रोगाची लक्षणे आजाराचा संसर्ग झाल्यास प्रथम जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते, लसिकाग्रंथीना सूज येते, सुरुवातीस ताप येतो, दुधाचे प्रमाण कमी होते, चारा खाणे, पाणी पिणे कमी होते, हळूहळू डोके, मान, मायांग, कास इ. भागाच्या त्वचेवर 10-50 मिमी व्यासाच्या गाठी येतात, तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो, डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, डोळ्यांची दृष्टी बाधित होते, पायावर सूज येऊन काही जनावरे लंगडतात.  शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी लम्पी त्वचा रोग हा संसर्गजन्य रोग आहे. रोग येऊच नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये याकरिता शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे. बाह्य कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी. निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे. गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येऊ नये. रोग सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्थांशी संपर्क साधावा. लम्पी आजाराने घाबरू नका, 'या' पद्धतीने घ्या प्राण्यांची काळजी, पाहा VIDEO बाधित जनावरांची स्वतंत्र व्यवस्था बाधित गावांमध्ये बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. साथीच्या काळात बाधित भागातील जनावरे व मानवाचा निरोगी भागात प्रवेश टाळावा. गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात. बाधित परिसरात स्वच्छता करावी व निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी. दरम्यान, या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी 8 फूट खोल खड्यात गाडून विल्हेवाट लावावी.  
    First published:

    Tags: Satara, Satara news, सातारा

    पुढील बातम्या