Home /News /maharashtra /

संतापजनक! नागपूरमध्ये अवघ्या 11 वर्षीय चिमुकलीवर 9 जणांकडून सामूहिक बलात्कार

संतापजनक! नागपूरमध्ये अवघ्या 11 वर्षीय चिमुकलीवर 9 जणांकडून सामूहिक बलात्कार

नागपूरच्या उमरेड शहरात अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. नऊ नराधमांनी अवघ्या 11 वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

नागपूर, 28 जुलै : एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार नागपूर जिल्ह्यातील उमरेडमध्ये समोर आला आहे. गेल्या एक महिन्यात पीडितेवर 9 आरोपींनी अत्याचार केल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले. त्यांनतर उमरेड पोलिसांनी पीडितेवर अत्याचार करणाऱ्या सर्व 9 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील मुख्य आरोपी रोशन कारगाकर या प्रकरणाचा मास्टरमाईंड असून त्याने 23 जुलैला एक हत्या देखील केली होती. त्याप्रकरणात तो पोलीस कोठडीत असताना पोलिसांनी गुप्तहेराकडून त्याच्या या कृत्याची माहिती मिळवली. त्यानंतर पोलिसांनी पीडितेचा शोध घेतला. पोलिसांनी पीडितेला विश्वासात घेत हे धक्कादायक वास्तव पुढे आणले. त्यानंतर आरोपी रोशनच्या इतर नऊ साथीदारांना पोलिसांनी अटक केली. नेमकं प्रकरण काय? नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहर एका सामूहिक अत्याचाराच्या घटनेने हादरले आहे. एक 11 वर्षीय पीडित मुलीला मुख्य आरोपी आरोपी रोशन कारगाकर याने सुरवातीला आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर पीडितेला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या इतर मित्रांकडून तिच्यावर अनेकवेळा अत्याचार करून घेतला. या बदल्यात रोशन हा इतर आरोपींकडून पैसे घेत होता. (बीडमध्ये 'देवमाणूस'चा फुगा फाटला, डॉक्टर निघाला कंपाउंडर, अवैध गर्भपात करणाऱ्या नराधमाला बेड्या) या दरम्यान उमरेड पोलीस ठाणे हद्दीमध्ये 23 जुलैला शुभम दमडू या तरुणाची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी रोशन आणि त्याच्या इतर एका साथीदाराला अटक केली होती. त्या दरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की रोशनचे मित्र एका अकरा वर्ष अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करत आहेत. त्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीचा शोध घेतला. पोलिसांनी पीडित मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता धक्कादायक माहिती तिने पोलिसांनी दिली. मागच्या एक महिन्यात रोशनच्या 9 मित्रांनी तिच्यावर अत्याचार केला. याबद्दल कुणाला सांगितले तर आरोपी रोशनने पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या संदर्भात पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून सर्व 9 आरोपींना अटक केली आहे. संबंधित घटनेप्रकरणी सर्व आरोपींना 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.
Published by:Chetan Patil
First published:

Tags: Crime, Gang Rape, Nagpur, Nagpur News

पुढील बातम्या