Home /News /maharashtra /

बीडमध्ये 'देवमाणूस'चा फुगा फाटला, डॉक्टर निघाला कंपाउंडर, अवैध गर्भपात करणाऱ्या नराधमाला बेड्या

बीडमध्ये 'देवमाणूस'चा फुगा फाटला, डॉक्टर निघाला कंपाउंडर, अवैध गर्भपात करणाऱ्या नराधमाला बेड्या

एका बनावट 'देवमाणूस' डॉक्टरचा बीडमध्ये फुगा फाटला आहे. हा डॉक्टर खरंतर कंपाउंडर होता. तो निसर्गोपचार केंद्राच्या नावाखाली अवैध गर्भपात केंद्र चालवायचा. अखेर त्याच्या कृत्यांची माहिती समोर येताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

पुढे वाचा ...
बीड, 28 जुलै : डॉक्टरांना आपण देव मानतो. डॉक्टर खरंच अनेकांचा प्राण वाचवतात. पण काही नराधम डॉक्टराचं सोंग करतात आणि सर्वसामान्यांना लुटतात. ते डॉक्टर बनून नको ते कृत्य करतात. अशाच एका बनावट 'देवमाणूस' डॉक्टरचा बीडमध्ये फुगा फाटला आहे. हा डॉक्टर खरंतर कंपाउंडर होता. तो निसर्गोपचार केंद्राच्या नावाखाली अवैध गर्भपात केंद्र चालवायचा. अखेर त्याच्या कूकृत्यांचे कारनामे उघड झाले आहेत. आरोपी डॉक्टरचं नाव डॉ. नंदकुमार स्वामी असं आहे. त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नेमकं प्रकरण काय? मुलाच्या हव्यासापोटी विवाहितेचा निर्दयीपणे अवैध गर्भपात केल्याची घटना 3 दिवसांपूर्वी परळीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी अवैध गर्भपात करणाऱ्या डॉ. नंदकुमार स्वामी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी डॉक्टरला काल सायंकाळी उशिरा, न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. डॉ. स्वामीवर यापूर्वीसुद्धा अवैध गर्भपाताचे 3 गुन्हे दाखल आहेत. परळीतील एक दाम्पत्यानं एका मित्राच्या मदतीने, डॉ. स्वामीकडे अवैधपणे गर्भलिंग चाचणी केली. त्यात त्या दाम्पत्याला दुसऱ्यांदा मुलगी होणार हे कळलं. पती आणि सासूच्या सांगण्यावरून डॉक्टरनं त्या महिलेला एक इंजेक्शन देत, महिलेच्या इच्छेविरोधात अवैधरित्या गर्भपात केला. या प्रकरणी परळी न्यायालयाने डॉ. नंदकुमार स्वामी याला 7 दिवसांची म्हणजे 4 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ('राष्ट्रपत्नी' कमेंटवरून संसदेत सोनिया गांधी आणि स्मृती इराणींमध्ये इतकी जुंपली; इतर खासदारांना करावी लागली मध्यस्थी) नंदकुमार स्वामी हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आहे. प्राथमिक माहितीनुसार तो एका रुग्णालयात कंपाउंडर म्हणून काम करत होता. तिथे शिकलेल्या या जुजबी ज्ञानावर तो लोकांसमोर डॉक्टर म्हणून वावरू लागला. बार्शीतल्या दत्तनगर परिसरात निसर्गोपचार केंद्राच्या नावाखाली त्याने अवैध गर्भपात केंद्र सुरु केले. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा देखील झाला होता. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यात देखील त्याचे हे अवैध व्यवसाय सुरूच होते. 2017 साली परळी, बार्शी आणि सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यात स्वामी हा अवैध गर्भपाताचे केंद्र चालवायचा. त्याच्या काळ्या धंद्याचा पोलिसांना सुगावा लागला आणि त्यावेळी त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करावी. अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातील अनेक संघटनांनी केली होती. त्यानंतर 3 वर्षाची शिक्षा भोगल्यानंतर बार्शी सत्र न्यायालयाने नंदकुमार स्वामीला जामीन मंजूर केला. जामीनावर बाहेर असलेल्या स्वामीने बीडमध्ये पुन्हा अवैध गर्भपात करायला सुरुवात केली. मात्र, त्याच्या याच काळ्या धंद्याची माहिती पुन्हा समोर आली आहे. त्याने ज्या महिलेचा गर्भपात केला त्याच महिलेने परळी पोलिसांना दिली. यामुळे पोलिसांकडून पुन्हा पोटात कोवळ्या कळ्यांना कुस्करणाऱ्या नराधमाच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या