मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nagpur Crime : गृहमंत्र्यांच्या शहरात बलात्कार प्रकरणातील साक्षीदाराची गोळ्या झाडून हत्या

Nagpur Crime : गृहमंत्र्यांच्या शहरात बलात्कार प्रकरणातील साक्षीदाराची गोळ्या झाडून हत्या

नागपूरमध्ये धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. बलात्कार प्रकरणातील साक्षिदाराची हत्या करण्यात करण्यात आली आहे. ही हत्या आरोपी भावाकडून करण्यात आली आहे. (Nagpur Crime)

नागपूरमध्ये धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. बलात्कार प्रकरणातील साक्षिदाराची हत्या करण्यात करण्यात आली आहे. ही हत्या आरोपी भावाकडून करण्यात आली आहे. (Nagpur Crime)

नागपूरमध्ये धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. बलात्कार प्रकरणातील साक्षिदाराची हत्या करण्यात करण्यात आली आहे. ही हत्या आरोपी भावाकडून करण्यात आली आहे. (Nagpur Crime)

नागपूर, 13 सप्टेंबर : नागपूरमध्ये धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. बलात्कार प्रकरणातील साक्षिदाराची हत्या करण्यात करण्यात आली आहे. ही हत्या आरोपी भावाकडून करण्यात आली आहे. (Nagpur Crime) मृतक केशव मस्के हा एका बलात्काराच्या प्रकरणाचा साक्षीदार होता त्या प्रकरणातील आरोपीच्या भावाने राग मनात ठेवून केशववर सायंकाळी गोळी झाडून त्याचे हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी भारत कळंबे याला अटक केली आहे.

तीन वर्षांपूर्वी आरोपी प्रेमराज कळंबे याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. त्या प्रकरणाचा केशव मस्के साक्षीदार असल्याने साक्ष बदलण्यासाठी आरोपी व त्याच्या भावाकडून वारंवार दबाव टाकला जात होता. मात्र केशव मस्के साक्ष बदलण्यास तयार नसल्याने आरोपीने हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा : महामार्गावर तरुणाच्या दुचाकीने घेतला पेट; दृश्य पाहून मुख्यमंत्री भरपावसात गाडीतून उतरले अन्..., VIDEO

तीन वर्षापूर्वी आरोपीच्या भावाने एका आदिवासी मुलीवर बलात्कार केला होता. ती पीडित मुलगी ही मस्के यांच्या शेतावर काम करणाऱ्या महिलेची होती त्यामुळे मस्के त्या प्रकरणात साक्ष देण्यावर ठाम होते. आरोपी हा भारतीय सैन्यात असून सुट्टी निमित्त तो गावाकडे आला होता. दरम्यान समजूतीतून हा विषय थाबण्याचा प्रयत्न सुरू होता. या दरम्यान आरोपीने दोन दिवसांपूर्वी केशव म्हस्के यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.

पुण्यातही धक्कादायक प्रकारसमोर

वडिलांना धमकवत घरात घुसून युवतीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न एका माथेफिरूनं केला. धक्कादायक प्रकार म्हणजे हा व्यक्ती नग्नावस्थेत होता. त्याने घरात घुसून वडिलांना शिवीगाळ केला आणि धमकी दिली. आत्यावर हल्ला केला ज्यामध्ये ती जखमी झाली. युवतीचा विनयभंग केला.

ही धक्कादायक घटना पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. 9 सप्टेंबरच्या रात्री अचानक 27 वर्षांचा तरुण नग्नावस्थेत एका घरात जबरदस्तीने घसला. त्याने लज्जास्पद कृत्य केलं. ज्यामुळे कुटुंबातील लोकांना किळसवाणं वाटलं. एवढ्यावरच तो थांबला नाही. त्याने मुलीच्या वडिलांना शिवीगाळ केला आणि धमकी दिली. कुटुंबातील व्यक्तींवर हल्ला केला आणि 17 वर्षांच्या युवतीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी दत्तावाडी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनय वाघमारे असं आरोपीचं नाव असल्याची माहिती मिळाली आहे.

हे ही वाचा : मुस्लीम मुलीशी लग्न करणाऱ्या हिंदू तरुणाची हत्या करून मृतदेह नदीत फेकला, आरोपींची कबुली

या घटनेमुळे पुण्यात चांगलीच खळबळ उडाली. विनय वाघमारे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास दत्तावाडी पोलीस करत आहेत. या घटनेत युवतीची आत्या जखमी झाली आहे.

First published:

Tags: Devendra Fadnavis, Murder news, Nagpur, Nagpur News, Rape case

पुढील बातम्या