मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नागपुरात खूनाचं सत्र सुरूच, कचरा वेचणाऱ्यांमध्ये वाद अन् घडलं भयानक हत्याकांड

नागपुरात खूनाचं सत्र सुरूच, कचरा वेचणाऱ्यांमध्ये वाद अन् घडलं भयानक हत्याकांड

विजय आणि बबलू उर्फ संजय सत्रामवार हे दोघे रविवारी काम संपल्यानंतर मिळालेल्या पैशांमधून दारू पिले. त्यानंतर त्यांच्यामध्ये पैशावरून वाद झाला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 16 जानेवारी :  नागपूरची वाटचाल क्राईम कॅपिटलकडे सुरू आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वीच नागपूरमधून हत्येच्या दोन घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा एक हत्येची घटना घडली आहे. ऐन संक्रातीच्या दिवशी हा खून झाला आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गोळीबार चौक परिसरात ही घटना घडली आहे. कचऱ्या वेचणाऱ्यांमध्ये पैशावरून वाद झाला आणि त्यानंतर हे हत्याकांड घडलं.  विजय असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून, बबलू उर्फ संजय सत्रामवार असं आरोपीचं नाव आहे.

 चाकूने वार  

घटनेबाबत अधिक माहिती अशी की विजय आणि बबलू उर्फ संजय सत्रामवार हे दोघे रविवारी काम संपल्यानंतर मिळालेल्या पैशांमधून दारू पिले. त्यानंतर त्यांच्यामध्ये पैशावरून वाद झाला.दोघेही दारू पिले असल्यानं आणि भांडणाचा राग अनावर झाल्यानं बबलूने आपल्या जवळ असलेल्या चाकूनं विजयवर सपासप वार केले. या घटनेमध्ये गंभीर जखमी झाल्यानं विजय याचा जागीच मृत्यू झाला.  पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

First published:

Tags: Crime, Crime news, Murder, Nagpur, Nagpur News