नागपूर : तत्काळ बुकिंग करताना बऱ्याचदा आपण नीट लक्ष देत नाही आणि पेमेंट करतो. काहीवेळा एजंटचीही मदत आपण यासाठी घेतो पण कधीकधी या सगळ्यात फसवणुकीचे बळी देखील होऊ शकता. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट सॉफ्टवेअरचा वापर करून रेल्वेची तात्काळ तिकीट बुकिंग करणाऱ्या आणि या तिकिटांचा काळाबाजार समोर आला. हा घोटाळा करणाऱ्या व्यक्तीचा नागपूर रेल्वे सुरक्षा दलाने पर्दाफाश केला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याकडचं सामना जप्त केलं आहे. विशेष म्हणजे या छाप्यात आर पी एफ ला 83 लाख रुपयांच्या हेराफेरी केल्याची माहिती समोर आली.
नागपुरात तात्काळ रेल्वे तिकीटाचा काळाबाजार, पाहा पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती#nagpur #railway #nagpurpolice pic.twitter.com/x53NwcQVMW
— News18Lokmat (@News18lokmat) May 16, 2023
पोलिसांनी आरोपीकडून दोन लॅपटॉप, मोबाईल तसेच 55 लाईव्ह तिकीट आरपीएफने जप्त केले. आरोपी प्रवीण झाडे हा 2016 पासून रेल्वे तिकिटांचा व्यवसाय करतो. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे मिळेल त्या दरात लोक रेल्वेची तिकीट खरेदी करत आहे.
आधी अश्लिल VIDEO बनवला, मग केलं भयानक कांड; वाचून हादराच बसेलत्याचाच फायदा घेत आरोपी प्रवीण झाडे याने बनावट सॉफ्टवेअरचा वापर करून रेल्वे रिझर्वेशनचे तिकीट मिळवण्यासाठी शक्कल लढवली आहे. त्याने हे सॉफ्टवेअर कुठून बनवलं त्यासोबत अजून यात कोणी सहभागी आहे का. या दृष्टीने देखील आरपीएफ तपास करत आहे.
‘विशालला त्याच्या आईने खाल्लं, मी त्याच्याकडे चालले, मला माफ करा’ मानसीचं डोळ्यात पाणी आणणारं पत्ररेल्वेमध्ये तत्काळ तिकीट बुकिंग करताना शक्यतो ऑफिशियल वेबसाईट किंवा IRCTC वरूनच बुकिंग करा. त्यामुळे तुमच्याकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जाणार नाहीत किंवा फसवणूक देखील होणार नाही. बनावट एजंडपासून सावध राहा नाहीतर तुमचं नुकसान होऊ शकतं.

)







