जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / 'विशालला त्याच्या आईने खाल्लं, मी त्याच्याकडे चालले, मला माफ करा' मानसीचं डोळ्यात पाणी आणणारं पत्र

'विशालला त्याच्या आईने खाल्लं, मी त्याच्याकडे चालले, मला माफ करा' मानसीचं डोळ्यात पाणी आणणारं पत्र

मानसीने असं का केलं?

मानसीने असं का केलं?

crime news : ‘आई आणि बाबा, मला माफ करा, मी तुमची चांगली मुलगी होऊ शकली नाही. मी विशाल दुबेवर खरं प्रेम केलंट

  • -MIN READ Local18 Unnao,Uttar Pradesh
  • Last Updated :

अनुज गुप्ता, प्रतिनिधी उन्नाव, 15 मे : ‘आई आणि बाबा, मला माफ करा, मी तुमची चांगली मुलगी होऊ शकली नाही. मी विशालवर खरं प्रेम केलं, त्याच्याशी लग्नही केलं आणि आता त्याच्याकडे जात आहे’ असं म्हणत एका तरुणीने हॉटेलमध्ये गळफास घेऊन जीवन संपवलं. धक्कादायक म्हणजे, 2 दिवसांपूर्वीच तिच्या होण्याऱ्या पतीने आत्महत्या केली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील गंगाघाट कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. एका हॉटेलमध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. गळफास घेऊन तिने आपलं जीवन संपवलं. मानसी असं मृत तरुणीचे नाव आहे. तिच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सुद्धा सापडली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये मुलीने आई-वडिलांची माफी मागितली आहे. सुसाईड नोटनुसार मुलीच्या प्रियकराने 2 दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती.

News18लोकमत
News18लोकमत

‘आई-बाबा मला माफ करा’ ‘आई आणि बाबा, मला माफ करा, मी तुमची चांगली मुलगी होऊ शकली नाही. मी विशाल दुबेवर खरं प्रेम केलं होतं, त्याच्याशी लग्नही केलं आणि आता त्याच्याकडे जात आहे. माझ्यासाठी कधीही रडू नका, तुमच्याशी खोटं बोलून मी घर सोडलं आहे, मी विशाल शिवाय राहू शकत नाही. मला आजपर्यंत त्याच्यासारखा कुणीही सापडलं नाही. माझ्या पतीला त्याच्या आईने खाल्लं होतं. मी कोणाच्याही दबावाखाली न राहता माझ्या इच्छेनं आत्महत्या केली आहे. मी माझ्या विशालकडे जात आहे मला माफ करा. तुम्ही माझ्यासाठी खूप चांगले होतात आणि विशाल चांगला पती होता. माझा भाऊ तुमच्यासोबत आहे. नेहमी आनंदी राहा… धन्यवाद ‘. असं म्हणून मानसीने आयुष्य संपवलं. (अपॉईंटमेंट लेटर मिळाल्यावर चेन्नईला नोकरीला गेला, पण.. मुंबईच्या तरुणासोबत भयानक प्रकार) मानसी एका फायनान्स कंपनीत काम करत होती. मानसी ही एका नातेवाईकाच्या घरी राहत होती, असं सांगून तिने एक रूम भाड्याने घेतली होती. तिने ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या केली, तिच्या रुमचा दरवाजा बंद होता. त्यामुळे हॉटेलच्या मॅनेजर संशय बळावला. त्याने पोलिसांना बोलावून घेतलं. पोलिसांनी जेव्हा दरवाजा तोडला तेव्हा मानसीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात