आशीष शर्मा, प्रतिनिधी दौसा, 16 मे : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी राजस्थानच्या जिल्ह्यातील रामगढ पाचवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीच्या काकाने तक्रार दाखल केली आहे की, त्याच्या पुतणीवर बलात्कार करून तिला विहिरीत फेकण्यात आले. पीडितेने संपूर्ण घटना कुटुंबियांना सांगितल्यानंतर रामगढ पाचवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
17 वर्षीय अल्पवयीन मुलगी भाजप नेत्याच्या शेतात बांधलेल्या होडात आंघोळ करत होती. दरम्यान, गोलू सैनी नावाच्या आरोपीने तिचा व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ दाखवून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. सुमारे अडीच महिन्यांपूर्वी आरोपीने पीडितेवर मोहरीच्या शेतात बलात्कार केला. यानंतर सुमारे 2 महिन्यांपूर्वी पीडित मुलगी शौचासाठी जात असताना आरोपीने तिला गव्हाच्या शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपी वारंवार बलात्कार करत होता. 4 मे रोजीही आरोपीने पीडितेला कारमध्ये बसवून पळवून नेले आणि निर्जन भागात जाऊन कारमध्येच बलात्कार केला. यानंतर आरोपी गोलूने त्याचा भाऊ सोनू यालाही बोलावले आणि दोन्ही आरोपी पीडितेला भाजप नेत्याच्या शेतात घेऊन गेले आणि तेथे पुन्हा एकदा आरोपीने बलात्काराची घटना केली. पीडितेने त्यांना हा प्रकार सर्वांना सांगेन असे सांगतच आरोपीने तिला विहिरीत फेकून दिले आणि पळ काढला. सकाळी पीडितेच्या रडण्याचा आवाज येताच, 5 मे रोजी पीडितेला विहिरीतून बाहेर काढण्यात आले आणि डोसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून तिला जयपूरला रेफर करण्यात आले. जयपूरमध्ये उपचार घेतल्यानंतर, पीडितेने तिच्या कुटुंबीयांना संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर आरोपी गोलू आणि सोनू यांच्याविरुद्ध रामगढ पाचवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.