मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Instagram वर प्रेयसी मुलांना फॉलो करत असल्याने होता नाराज; नागपुरातील प्रियकराने उचललं भयानक पाऊल

Instagram वर प्रेयसी मुलांना फॉलो करत असल्याने होता नाराज; नागपुरातील प्रियकराने उचललं भयानक पाऊल

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

नागपुरात एका 22 वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. त्याची गर्लफ्रेंड इंस्टाग्रामवर काही पुरुषांना फॉलो करत असल्याने त्याने हे पाऊल उचललं. (Nagpur Suicide News)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India
  • Published by:  Kiran Pharate

नागपूर 28 सप्टेंबर : नागपुरात एका 22 वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. त्याची गर्लफ्रेंड इंस्टाग्रामवर काही पुरुषांना फॉलो करत असल्याने त्याने हे पाऊल उचललं. या प्रकरणावरून दोघांमध्ये अनेक वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे. पण जेव्हा त्याच्या प्रेयसीने त्या पुरुषांना अनफॉलो करण्यास नकार दिला तेव्हा या तरुणाने थेट आत्महत्या केली.

कोल्हापूर हादरलं! पत्नीसह 2 मुलांची हत्या करून स्वतःच पोलिसांत हजर झाला पती

पोलिसांनी सांगितलं की, रोहन सिंह कपूर असं मृत तरुणाचे नाव असून तो राम नगरचा रहिवासी होता. रामदासपेठ परिसरात त्याने विषारी औषध प्राशन केल्यानं त्याचा मृत्यू झाला. रोहनवर खूप कर्जही असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे तो बऱ्याच दिवसांपासून नैराश्यात होता.

आज तकने याबाबतचं वृत्त दिलं आहे. यात म्हटलं आहे की जेव्हा रोहनने विष प्राशन केलं तेव्हा त्याने तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीला संपूर्ण गोष्ट सांगितली. मग आपला मोठा भाऊ वीरपाल सिंह कपूरला फोन करून तिथे बोलवण्या सांगितलं. माहिती मिळताच वीरपालने घटनास्थळ गाठून रोहनला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेलं. मात्र उपचारादरम्यान रोहनचा मृत्यू झाला.

बेशुद्ध करुन दिला विजेचा शॉक! प्रियकराच्या मदतीने पतीसोबत भयानक कांड

दुसरीकडे, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. तरुणाची प्रेयसी आणि कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे. सध्या तपास सुरू आहे.

यापूर्वी नागपुरात एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीसोबत लग्न न झाल्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. यात तरुणीचं लग्न दुसऱ्याशी ठरलं होतं, त्यानंतर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुखदेव देवरा वरखडे असं मृताचं नाव होतं. हा तरुण गुमगावचा रहिवासी होता. हा तरुण एका कंपनीत गार्ड म्हणून काम करत होता.

First published:

Tags: Crime news, Shocking news