मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कोल्हापूर हादरलं! पत्नीसह 2 मुलांची हत्या करून स्वतःच पोलिसांत हजर झाला पती

कोल्हापूर हादरलं! पत्नीसह 2 मुलांची हत्या करून स्वतःच पोलिसांत हजर झाला पती

कागलमध्ये घडलेल्या या घटनेत कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने बायको आणि मुलांचा खून केला आहे. हत्या केल्यानंतर महिलेचा पती स्वतःच पोलिसांत हजर झाला आणि याबाबत माहिती दिली. (Kolhapur Murder News)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India
  • Published by:  Kiran Pharate

crज्ञानेश्वर साळुंखे, कोल्हापूर 28 सप्टेंबर : कोल्हापुरमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या कुटुंबातीलच सदस्याने केल्याने एकच खळबळ उडाली. कागलमध्ये घडलेल्या या घटनेत कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने बायको आणि मुलांचा खून केला आहे. हत्या केल्यानंतर महिलेचा पती स्वतःच पोलिसांत हजर झाला आणि याबाबत माहिती दिली.

मुलाच्या वादात मध्यस्थी केली, थेट गळा आवळत पित्याचाच खून, यवतमाळेतील धक्कादायक प्रकार

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्रकाश बाळासाहेब माळी (वय ४२) असं या घटनेतील आरोपीचं नाव आहे. काळम्मावाडी वसाहतीजवळील घरकुलामध्ये मंगळवारी दुपारी दोनपासून रात्री आठपर्यंत हा थरकाप उडविणारा घटनाक्रम घडला. त्यानंतर प्रकाश रात्री नऊच्या दरम्यान स्वतःहून कागल पोलीस ठाण्यात हजर झाला आणि याबाबत माहिती दिली.

पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं, की प्रकाश शहरातील काळम्मावाडी वसाहतीजवळील घरकुलामध्ये पत्नी, मुलगा आणि मुलीसह राहायचा. मंगळवारी दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास मुलं शाळेला गेल्याचं पाहून प्रकाशने पत्नीचा गळा आवळून खून केला.

पतिसोबत महिलेचं भयानक कृत्य, गुप्तांग कापलं अन् रात्रभर झोपली मृतदेहासोबत

सायंकाळी साडेपाचला मुलगा कृष्णात शाळेतून घरी आला. कृष्णात दिव्यांग होता. प्रकाशने मुलाचाही दोरीने गळा आवळला आणि खून केला. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास बाहेर गेलेली मुलगी आदिती घरी परत आली. यावेळी आरोपीने तिचाही गळा आवळण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. यामुळे प्रकाशने तिच्या डोक्यात वरवंटा मारला आणि तिचीही हत्या केली. यानंतर तो स्वतः पोलिसांत हजर झाला.

First published:

Tags: Crime news, Murder