अमरावती, 05 ऑगस्ट : नागपूर-औरंगाबाद महामार्गावर (Nagpur Aurangabad Highway) नांदगाव खंडेश्वर तालुक्यात शिंगणापूर फाट्या जवळ दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे. दरम्यान दोन्ही ट्रकचा अपघात इतका भीषण होता कि त्यातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. महामार्गावरील खड्डा वाचवताना हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातामूळे महामार्गावरील वाहतूक बराच काळ खोळंबल्याने लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
सळई घेऊन जाणारा ट्रक दुसऱ्या ट्रकवर आदळल्याने सळई दोन जणांच्या अंगातून आरपार गेली.
हे ही वाचा : महागाईविरोधात काँग्रेसचा एल्गार; काँग्रेस नेत्यांची धरपकड, संजय निरुपम यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
रस्ते वाहतूक वेगवान व्हावी म्हणून राज्यात महामार्गांचे जाळे उभारले जात आहे. प्रत्येक महामार्गांवर वाहनांचा वेग मर्यादित केला, तरीपण वाहनचालकांकडून नियम पायदळी तुडविले जात आहेत. त्यामुळे राज्यात दररोज रस्ते अपघातात सरासरी ४३ जणांचा मृत्यू होत असून जानेवारी ते जून या सहा महिन्यांत पावणेआठ हजार अपघाती मृत्यू झाले आहेत. त्यात पुणे, नगर, नाशिक, सोलापूर, सातारा, जळगाव, नागपूर, कोल्हापूर, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर या ११ जिल्ह्यांचा प्रवास जीवघेणा ठरला आहे.
औष्णिक विद्युत केंद्राचा राखेचा तलाव फुटल्याच्या प्रकरणाची गांभीर्याने दखल
कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातील राखेचा तलाव फुटल्याने नागपूरच्या कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कामठी तालुक्यातील पाच गावांमध्ये या राखेमुळे नुकसान झालं होतं. याप्रकरणात आता प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात स्थापत्य विभागाचे अभियंता शिरीष वाठ आणि अॅश हँडलिंग प्लांटचे कार्यकारी अभियंता प्रवीण मडावी या दोन अधिकाऱ्यांना दोषी ठरवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली गेली आहे.
हे ही वाचा : मुंबई, पुण्यासह राज्यात मुसळधार पाऊस, पुढचे 8 दिवस ‘या’ जिल्ह्याना इशारा
संबंधित तलाव हा राज्य सरकारच्या वीजनिर्मिती कंपनीचा असून तो 314 हेक्टरमध्ये पसरला आहे. वीजनिर्मितीसाठी जाळण्यात येणाऱ्या कोळशाच्या राखेतील घटक म्हणजेच FLY ASH मधील विषारी घटक यात असतात, असं तज्ञांनी सांगितलं. तलाव फुटल्याने हीच राख आसपासच्या 5 गावांमध्ये पसरली होती. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत कारवाई केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Ahmednagar-Aurangabad Highway, Major accident, Nagpur