मुंबई, 05 ऑगस्ट : जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने राज्यात थैमान घातले. राज्यातील विविध भागात झालेल्या पावसाने शेती पिकाचे लाखो हेक्टर नुकसान झाले आहे. (Maharashtra Rain Update) दरम्यान राज्याच्या सर्वच भागात पुढील 8 दिवस पाऊस चांगलाच जोर धरणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरीसह कोल्हापूर, नाशिक, पुणे सातारा या जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर मुसळधार बरसणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या बहुतांश भागात पावसाचा जोरदार अंदाज असल्याचे सांगण्यात आले.
जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र, त्यानंतर सुमारे तीन आठवड्यांहून अधिक काळ पावसाने उघडीप दिली. पुन्हा कडक उन्हाचा तडाखा जाणवू लागला होता. बुधवारपासून राज्यात पुन्हा पावसाचे आगमन झाले आहे. अर्थात मध्य-पूर्व बंगालच्या उपसागरापासून ते आंध्र प्रदेशापर्यंत चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे राज्यात पाऊस वाढला आहे.
हे ही वाचा : आणखी एक धक्का; कुस्तीगीरनंतर या संघटनेतील अध्यक्षपदही पवारांच्या हातून जाणार, अजित दादांना द्यावा लागणार राजीनामा
याबरोबर ऑगस्टच्या 7 आसपास बंगालच्या उपसागरातील उत्तर पश्चिम भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या पट्ट्याची तीव्रता आणखी वाढणार आहे. त्यामुळेच राज्यात पाऊस वाढणार आहे.
5/8,Latest satellite obs indicate mod to dense clouds off the coast of south Konkan,Goa,Karnataka &Kerala
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 5, 2022
Ghat areas also.Gujarat too
Interior of Maharashtra including Mumbai Thane cloudy weather
Nxt 4 days,Monsoon active in Mah & few places flood like situation
Pl see IMD alerts pic.twitter.com/HiOm9MiBhQ
पुढील पाच दिवस यलो अलर्ट
पालघर, ठाणे, मुंबई, धुळे नंदूरबार, जळगाव, नांदेड, नगर पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, बुलडाणा, गोंदिया, वर्धा वाशीम, यवतमाळ.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग नाशिक, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात 5 ते 8 ऑगस्ट दरम्यान ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हे ही वाचा : नामांकित बिल्डरला धमकी, मुंबईत पुन्हा डी गँग कार्यरत? छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रूटला बेड्या
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार
11 ऑगस्टपर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस असल्याचे सांगण्यात आले आहे. कोकण, गोवा, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतही 7-8 ऑगस्टला मुसळधारची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील अनेक भागात पाऊस पुन्हा बरसण्यास सुरुवात झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी सोलापूर, यवतमाळ, जालना, धुळे यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे.