नागपूर, 01 नोव्हेंबर : शहरात सर्वत्र सिमेंट काँक्रिटची जंगल उभी राहत आहेत. काळाच्या ओघात आणि प्रगतीच्या वेगात आक्राळ विक्राळ वाढत्या शहरीकरणाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तिथल्या पर्यावरणावर परिणाम होतो. हल्ली शहरात क्वचितच पाखरांची किलबिल, पक्ष्यांचे थवे बघावयास मिळतात. मात्र, नागपूरच्या ऐन मध्यवर्ती भागात गजबजलेल्या वसाहतीतील गच्चीवर विविध प्रजातींच्या पाखरांची शाळा भरते. नागपुरातील गोधनी रोड झिंगाबाई टाकळी येथे राहणारे जयंत तांदुळकर यांनी आपल्या राहत्या घरातील टेरेसवर अनोखी बाग फुलवली आहे. टेरेस गार्डनच्या माध्यमातून विविध प्रजातींच्या पक्ष्यांसाठी दाना-पानी- निवारा हा उपक्रम राबविला आहे. मागील 15 वर्षापासून हा उपक्रम अविरतपणे चालू असून जयंत तांदुळकर यांच्या टेरेसवर दिवसाकाठी हजारो पक्ष्यांची ये-जा सुरू असते. 40 हून अधिक पक्षी आत्तापर्यंत येऊन गेल्याची नोंद दररोज पक्षी येथे येतात दाणा, पाणी घेतात, मुक्तपणे संचार करीत आपल्या इच्छित स्थळी निघून जातात. शहरात क्वचितच पाहायला मिळणारे असंख्य पक्षी जयंत तांदुळकर यांच्या टेरेस गार्डन वर हमखास पाहायला मिळतात. त्यात प्रामुख्याने कोकिळा, ब्राम्हनी मैना, साळुंकी, मुनिया, कोतवाल, सातभाई, राखीवटवटया, शिंपी, सूर्य पक्षी, दयाळ, शिक्रा, पिंगळा, पोपट, भारद्वाज, कोतवाल, खंड्या आदी सारखे 40 हून अधिक पक्षी आत्तापर्यंत येऊन गेल्याची नोंद असल्याचे जयंत सांगतात. Video : तरुणानं उभारलं देशातील पहिलं जनावरांचं क्वारंटाईन सेंटर, लम्पीवर देतोय मोफत उपचार 15 वर्षपासून पक्षांची सोय पक्षांसोबतच मधमाशी, खरूताई, सरडे, फुलपाखरू, बेडूक इत्यादी सारखे पाहुणे देखील अधून मधून भेट देत असतात. जयंत तांदुळकर सांगतात की, मी साधारण 15 वर्षपासून नियमित माझ्या टेरेस गार्डनमध्ये पक्ष्यांकरिता पाणी व थोडे अन्न याची सोय करतो. यासाठी बांबूपासून किंवा टाकाऊ प्लेट्स, नारळाच्या करवंटी पासून स्वतःच बनविलेल्या फिडर पॉट, लावलेले आहेत. तसेच पाण्याकरिता मातीचे भांडे ठेवले आहे. चिमण्यांच्या प्रजनणाकरिता अनेक लाकडी बर्ड्स हाऊस तयार करून लावलेले आहेत. महिन्याला 4-5 हजारांचा खर्च परिसरात चिमण्यांची संख्या ही वाढली आहे. हे कार्य माझ्या घरा पुरतेच मर्यादित न ठेवता इतरांनाही ह्या कार्याची प्रेरणा देतो. फिडर पॉट, बर्ड्स हाऊस बनवून फुकटात खूप लोकांना दिलेत व देत असतो. तसेच उन्हाळ्यात पक्ष्यांकरिता विविध ठिकाणी पाण्याच्या पात्राची, पाणपोयांची सोय केलेली आहे. या सर्वकामासाठी महिन्याला 4-5 हजार रुपांयापर्यंत खर्च येतो. मात्र या सर्वातून मला जो आनंद आणि समाधान लाभते ते लाख मोलाचा असल्याचे जयंत तांदुळकर सांगतात. नागपूरच्या आकाशची शिवरायांना मानवंदना, 19024 फूट उंचीवर फडकवला भगवा, Video पक्षांसाठी वृक्षारोपण पक्ष्यांच्या अफलातून उपक्रमा बरोबरच जयंत तांदुळकर यांनी मागील 18 ते 20 वर्षांपासून पक्ष्यांना उपयोगी होतील अशा हजारांवर देशी वृक्ष्यांचे वृक्षारोपण केले आहे. यात वड, पिंपळ, उंबर, बाभूळ, आंबा, बकुळ, करंज, कडुनिंब, पेरू, चींचा यांचा समावेश आहे. हे कार्य मी माझ्या कार्य क्षेत्राच्या ठिकानी, घराच्या परिसरात, विविध रस्त्याच्या कडेला, व योग्य जागा मिळेल अशा ठिकाणी झाडे लावून केले आहे. आज मी लावलेल्या झाडांना आलेली फळे पक्ष्यांना खाताना पाहून मला खूप समाधान होते असे तांदुळकर सांगतात. महालेखाकर कार्यालय, सिव्हिल लाईन, नागपूर येथे सिनीयर अकांऊटंट या पदावर कार्यरत असलेले जयंत तांदुळकर यांनी आपल्या नौकरीपेशा सांभाळून पक्षांसाठी चालविलेले हा अभिनव उपक्रम खरच कौतुकास्पद आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.