नागपूर, 01 नोव्हेंबर : शिवरायांच्या विचारातून प्रेरणा घेत नागपुरातील बाईकर आकाश साबळेनं 19 दिवसात 5020 किलोमीटरचा प्रवास केला आहे. एवढा प्रवास करून 19024 फुट उंचीवर असलेल्या उमलिंग ला टॉपवर भगवा झेंडा फडकावून शिवरायांना अभिवादन मानवंदना दिली. आकाश हा भारतातील पहिला भारतीय बाईक रायडर नर्स आहे ज्याने हा साहसी प्रवास केला आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या मावळ मातीत राष्ट्रनिर्मितीचे स्फुलिंग चेतवून हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. शिवछत्रपती तमाम महाराष्ट्राचे आदर्श स्थान आहेत. शिवरायांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन अनेक क्रांतिकारकांनी त्यागाची परिसीमा गाठली. आज प्रदीर्घ काळ लोटला तरी शिवरायांच्या विचारांनी नवं तरुण भारावून जातात. शिवरायांच्या विचारातून प्रेरणा घेत नागपूर येथील युवा बाईकर असलेल्या आकाश साबळेनं लडाखमधील उमलिंग ला टॉपवर भगवा झेंडा फडकवण्याची मोहीम हाती घेतली. साहसी प्रवास करण्याचा छंद इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयात पुरुष परिचारिका (नर्स) म्हणून आकाश साबळे कार्यरत आहे. मोटारसायकल वरून लांबवर प्रवास करण्याच्या नवनवीन मोहीम आखून साहसी प्रवास करण्याचा छंद आकाशला आहे. शिवरायांच्या प्रति नितांत आदर आणि आपल्या आवडीच्या छंदातून काहीतरी वेगळे करत शिवरायांना अभिवादन करावे, शिवरायांचे चरित्र, गडकिल्ले, महाराष्ट्रातील वारसा , संस्कृती इत्यादी महाराष्ट्राबाहेरील लोकांना देखील माहिती व्हावी, या उद्देशाने आकाशने मोहीम हाती घेतली. मोहिमेअंतर्गत लोकांशी भेटीगाठी मोहिमेअंतर्गत लोकांशी भेटीगाठी, लोक संपर्क करत आपल्या परीने करता येईल तेवढा प्रचार प्रसार आकाशने केला. महाराष्ट्रातील किल्ले, मंदिर यांचा समृद्ध वारसा आपण बघायला महाराष्ट्रात यायला हवे असे निमंत्रण आकाशने दिले. त्यासोबत सुरक्षित रोड प्रवास, सेफ ड्रायव्हिंग, ड्रायव्हिंग नियमांचे पालन, अपघात मुक्त प्रवास इत्यादी विषयांवर देखील अनेकांशी संवाद साधला. Success Story : दहावीतच दृष्टी गेली पण हार मानली नाही, जिद्दीनं मिळवली सरकारी नोकरी! आकाशच्या प्रवासादरम्यान 15 माउंटेन पासचा समावेश होता. त्यात कुंजुम दर्रा, स्पीति घाटी-15059 फूट, बारालाचा दर्रा- 15912 फूट, नकी ला- 15547 फूट, लाचुंग ला- 16616 फूट, तंगलांग ला- 17482 फूट, खारदुंग ला- 17982 फूट, वारी ला- 17216 फूट, के ला- 18600 फूट, चांग ला- 17586 फूट, नूरबुला टॉप- 17328 फूट, उमलिंग ला- 19024 फूट, फोटी ला- 18124 फूट, फोटू ला- 13479 फूट, नामिक ला- 12198 फूट, ज़ोज़ी ला - 11649 फूट यांचा समावेश होतो. शंभरहून अधिक बाईक राईड उमलिंग ला टॉप हे लडाखमधील उंच शिखर आहे. या पर्वताची नोंद गिनीज बुकमध्ये देखील झाली आहे. आकाशने आजतागायत शंभरहून अधिक बाईक राईड यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. ऑरेंज सिटी रायडर्स नावाने ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून अनेक साहसी मोहिमांचे आयोजन करण्यात येते. तसेच नवं तरुण बाईकर यांना सेफ राईडचे धडे दिले जातात. Video : तरुणानं उभारलं देशातील पहिलं जनावरांचं क्वारंटाईन सेंटर, लम्पीवर देतोय मोफत उपचार बजाज डोमिणार-400 ची साथ आकाशने बजाज डोमिणार-400 या मोटारसायकलने लुधियानामधून प्रवास सुरू केला. या प्रवासात आकाश सोबत पूर्ण वेळ आरिफ दिवाण हे होते. तर 3 दिवसाच्या प्रवासात निश्चय कोहड हे सामील झाले होते. आकाश हा भारतातील पहिला भारतीय बाईक रायडर नर्स आहे ज्याने हा साहसी प्रवास केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







