विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 13 एप्रिल: डॉ. बाबासाहेब आंबेडकरां नी 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. दीक्षाभूमीवर रक्ताचा एकही थेंब न सांडता ही धम्म क्रांती झाल्याचं मानलं जातं. त्यामुळे डॉ. आंबेडकर आणि नागपूर एक वेगळं नातं आहे. बाबासाहेबांच्या अनेक स्मृती नागपूरकरांनी जपल्या आहेत. आता नागपुरातील चिचोली शांतीवन येथे जागतिक दर्जाचे संग्रहालय होत असून यामध्ये आंबेडकरांच्या आयुष्यातील 1 हजारांहून अधिक वस्तू पाहायला मिळणार आहेत. चिचोलीतील शांतीवनने जपल्या बाबासाहेबांच्या स्मृती नागपूरमध्ये दरवर्षी 14 ऑक्टोबरला लाखो आंबेडकर अनुयायी भेट देत असतात. तसेच बाबासाहेबांच्या सहवास लाभलेल्या विविध ठिकाणांना भेटी देतात. त्यातीलच एक म्हणजे कमळेश्वर रोडवर असलेल्या चिचोलीतील शांतीवन होय. नागपुरातील धम्मचक्र परिवर्तन कार्यक्रमाची धुरा सांभाळणारे वामनराव गोडबोले यांनी पुढाकार घेतला आणि 14 एकर परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर आणि स्मृती संग्रहालय तयार करण्यात येत आहे. याच संग्रहालयात बाबासाहेबांच्या रोजच्या वापरातील 1 हजारांहून अधिक वस्तूंचा अमूल्य ठेवा जपण्यात आला आहे.
संग्रहालयात बाबासाहेबांच्या वापरातील वस्तू शांतीवन येथील संग्राहलयात बाबासाहेबांच्या आयुष्यातील अनेक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. नानकचंद रत्तू हे बाबासाहेबांचे खजगी सचिव होते. त्यांच्या संग्रही असलेल्या वस्तू वामनराव गोडबोले यांनी संग्रहालयात ठेवल्या आहेत. त्यात प्रामुख्याने ज्या टाईप राईटरवर बाबासाहेबांनी संविधानाचा मसुदा तयार केला होता त्या टाईपराईटरचाही समावेश आहे. तसेच, हायकोर्ट मध्ये वापरलेला झगा, पेन, छत्री, टोपी, कोट, चष्मा अशा असंख्य वस्तू येथे ठेवण्यात आल्या आहेत. यासह 9 डिसेंबर 1956 रोजी वामनराव गोडबोले यांनी आणलेला अस्थिकलश देखील येथे दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. अवकाशातील ताऱ्याला मिळालं बाबासाहेबांंचं नाव, 132 व्या जयंतीदिनी ‘या’ पद्धतीनं घ्या दर्शन, Video बुद्धीस्ट सेमिनरी स्थापन्याची बाबासाहेबांची इच्छा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मक्रांती घडवून आणली. तेव्हा या कार्यक्रमाचे नियोजन बाबासाहेबांचे विश्वासू वामनराव गोडबोले यांनी केली होती. हा सोहळा संपन्न होताच 15 ऑक्टोबर 1956 रोजी आंबेडकर आणि गोडोले यांच्यात बुद्धीस्ट सेमिनरी स्थापन्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. बेंगलोरच्या राजाने तेथील पाच एकर जमीन त्यासाठी दान देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बाबासाहेबांनी दिली. मात्र जिथे धम्मक्रांती झाली तिथेच म्हणजे नागपुरात बुद्धीस्ट सेमिनरी स्थापन केली जावी, अशी बाबासाहेबांची इच्छा होती. गोपिकाबाई ठाकरे यांनी दिली जमीन बुद्धीस्ट सेमिनरी नागपुरात स्थापन्याचे ठरले होते. परंतु, 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले. बाबासाहेबांच्या कार्यात आपलेही योगदान असावे म्हणून अनुयायी असणाऱ्या गोपिकाबाई ठाकरे यांनी बुद्धीस्ट सेमिनरीला जमीन देण्याचा निर्णय घेतला. चिचोली येथील 11.36 एकर जमीन त्यंनी दान दिली. त्याच जागेत आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर, जागतिक दर्जाचे स्मृती संग्रहालय, ऑडिटेरियम याची निर्मिति करण्यात आली आहे. या इमारतीचे काम पूर्ण झाले असून लवकरच लोकार्पण होणार आहे, अशी माहिती बुद्धिस्ट कौन्सिल ट्रस्टचे चंद्रशेखर गोडबोले यांनी दिली. Latur News: भीम जयंतीनिमित्त अनोखी मानवंदना, 18 हजार वह्यांतून साकारले बाबासाहेब, Video लवकरच संग्रहालय होणार खुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर व स्मृती संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे जागतिक दर्जाचे संग्रहालय लवकरच हे सर्वांसाठी खुले होणार आहे. हे केंद्र लाखो बौद्ध अनुयायांसाठी आकर्षणाचे केंद्र असणार आहे. त्यांना या ठिकाणी बाबासाहेबांच्या वापरातील अमूल्य असा वस्तूरूपी ठेवा पाहता येणार आहे.