जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Latur News: भीम जयंतीनिमित्त अनोखी मानवंदना, 18 हजार वह्यांतून साकारले बाबासाहेब, Video

Latur News: भीम जयंतीनिमित्त अनोखी मानवंदना, 18 हजार वह्यांतून साकारले बाबासाहेब, Video

Latur News: भीम जयंतीनिमित्त अनोखी मानवंदना, 18 हजार वह्यांतून साकारले बाबासाहेब, Video

लातूर येथे भीम जयंतीनिमित्त 18 हजार वह्या वापरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

  • -MIN READ Latur,Maharashtra
  • Last Updated :

    ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 13 एप्रिल: लातूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर 11 हजार चौरस फूट जागेवर बाबासाहेबांचे भव्यदिव्य चित्र नोटबुक्स म्हणजे वह्यांच्या माध्यमातून साकारण्यात आले आहे. ही चित्राकृती साकारताना 18 हजार वह्यांचा वापर करण्यात आला आहे. 11 हजार चौरस फूट जागेवर वह्या वापरून उभारण्यात आलेली ही देशातील पहिलीच चित्राकृती आहे. त्यामुळे लातूरमधील या चित्राची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाने देखील नोंद घेतली आहे. विक्रमाची जागतिक नोंद खासदार सुधाकर शृंगारे यांच्या संकल्पनेतून हे चित्र साकारण्यात आले आहे. त्यामुळे वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाने त्यांच्या नावाचीही नोंद घेत विक्रम स्थापित केल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. अर्टिस्ट चेतन राऊत आणि त्यांच्या इतर 18 कलाकारांनी मिळून हे चित्र तीन दिवसांत साकारले आहे. 11, 12 आणि 13 एप्रिल रोजी हे चित्र लातूरकरांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाकडून प्रमाणपत्र 11 हजार चौरस फूट जागेवर साकारण्यात आलेल्या या चित्राकृतीचे उद्घाटन अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्ताने बाबासाहेबांना अभूतपूर्व पद्धतीने अभिवादन करण्यासाठी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या संकल्पनेतून हे भव्य चित्र साकारण्यात आले आहे. वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे मुख्य संपादक पवन सोलंकी यांनी या चित्राची विक्रमी नोंद झाल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. वह्या वापरून साकारलेले आंबेडकर यांचे देशातील पहिलेच चित्र नोट्बुकच्या माध्यमातून मोझ्याक पद्धतीने साकारण्यात आलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशातील हे पहिलेच चित्र आहे. 11 हजार चौरस फूट जागेवर रंगीत नोटबुक्स वापरून हे चित्र साकारण्यात आले आहे. हे चित्र पाहता यावे किंवा या चित्रा सोबत सेल्फी घेता यावी यासाठी उंच रॅम्पही या ठिकाणी उभारण्यात आला आहे. एका वेळी दहा लोक सेल्फी घेऊ शकतील असा हा रॅम्प आहे. मंगळवारपासून नागरिकांसाठी हे चित्र खुले करण्यात आले आहे. 13 एप्रिल रोजी मध्यरात्री तोफांची सलामी देऊन हे चित्र काढण्यात येईल. महात्मा गांधी नावाची जादू कायम, वर्षभरात ‘एवढ्या’ पर्यटकांनी दिली बापूंच्या आश्रमाला भेट, Photos चित्रासाठी वापरलेल्या वह्या विद्यार्थ्यांना वाटणार या चित्राकृतीसाठी वापरण्यात आलेल्या नोटबुक्स या लातूर लोकसभा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या गरजू मुलांमध्ये वितरित करण्यात येणार आहेत. या चित्राला चारही बाजूने कंपाउंड करून सुरक्षित करण्यात आले आहे. याशिवाय नागरिकांना हे चित्र स्पष्ट दिसावे यासाठी एलईडी वॉल देखील लावण्यात आले आहेत. दिवसा सूर्यप्रकाशात हे चित्र वेगळे दिसते आहे तर संध्याकाळी लाईट्सच्या इफेक्टमध्ये हे चित्र आणखीनच लक्षवेधी दिसत आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या चित्राला पाहण्यासाठी यावे, असे आवाहन खासदार सुधाकर शृंगारे यांच्या वतीने करण्यात आले आहे. गेल्या वर्षी उभारली होती 72 फूट उंच प्रतिकृती गेल्या वर्षी खासदार सुधाकर शृंगारे यांनी 72 फूट उंचीची डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती उभारली होती. हे चित्र पूर्ण करण्यासाठी आयोजकांच्या वतीने स्टारडस्ट ग्रुपच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले आहेत. या चित्राकृतीचे सध्या सर्वत्र कौतुक होते आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात