मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट! मनसे प्रमुख उद्या बीडच्या परळी कोर्टात हजर राहणार, काय आहे प्रकरण?

राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट! मनसे प्रमुख उद्या बीडच्या परळी कोर्टात हजर राहणार, काय आहे प्रकरण?

राज ठाकरेंविरोधात अटक वॉरंट!

राज ठाकरेंविरोधात अटक वॉरंट!

मनसे प्रमुख राज ठाकरे उद्या (बुधवारी) बीडच्या परळी कोर्टात हजर राहणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

सुरेश जाधव, प्रतिनिधी

बीड, 17 जानेवारी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे उद्या बीडच्या परळी कोर्टत हजर राहणार आहेत. चिथावणीखोर वक्तव्य आणि‎ मनसेच्या कार्यकर्त्यांनी बसवर‎ केलेल्या दगडफेकी प्रकरणी तारखेला सतत गैरहजर राहिल्याने परळी‎ न्यायालयाने राज ठाकरेंना‎ अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्या प्रकरणात जामीन घेण्यासाठी परळी कोर्टात हजर होणार आहेत.

राज ठाकरे हे  हेलिकॉप्टरने सकाळी 10 वाजता पांगरी येथील गोपीनाथ गड येथे येणार त्यानंतर परळी कोर्टात हजर राहणार आहेत. मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन दुपारी 1:30 वाजता मुंबईला रवाना होणार आहेत. 2008 मध्ये मध्ये राज‎ ठाकरेंना एका प्रकरणात मुंबईत‎ अटक करण्यात आल्यांनतर या‎ अटकेचे पडसाद परळीतही उमटले‎ होते. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर‎ मनसे कार्यकर्त्यांनी बसवर‎ दगडफेक केल्यानंतर मनसेच्या‎ कार्यकत्यांवर आणि राज ठाकरे‎ यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.‎ पोलिसांनी चार्शीट फाईल‎ केल्यानंतर राज ठाकरे परळीच्या‎ न्यायालयात तारखेला गैरहजर‎ राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध‎ अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.‎ या पूर्वी 3 जानेवारी आणि नंतर 12 जानेवारीला राज ठाकरेंना परळी‎ न्यायालयात हजर राहण्यास‎ सांगितले होते. अचानक काही कारणामुळे दौरा रद्द झाला होता. मात्र, उद्या सकाळी परळीत येणार असल्याने मनसे कार्यकर्त्यांनी स्वागताची तयारी केली आहे.

वाचा - Shivsena Symbol Crisis : धनुष्यबाण कुणाचं? पुन्हा मिळाली नवीन तारीख; आता 'या' दिवशी होणार सुनावणी

नेमकं काय प्रकरण आहे?

2008 मध्ये राज ठाकरेंना एका प्रकरणात मुंबईत अटक करण्यात आली होती. त्या अटकेचे पडसाद परळीतही उमटले होते. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर मनसे कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केली होती. याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर आणि चिथावणीखोर वक्तव्याबद्दल राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी चार्शीट फाईल केल्यानंतर राज ठाकरे न्यायालयात तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. आधी 3 जानेवारी आणि नंतर 12 जानेवारीला राज ठाकरेंना परळी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. पण, 12 तारखेला राष्ट्रमाता जिजाऊ जयंती होती, त्यामुळे न्यायालयाने तारीख वाढवून दिली आहे. त्यानुसार, आता त्यांना असून येणाऱ्या 18 जानेवारीला त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

First published:

Tags: Beed, Raj Thackeray