अमरावती, 30 ऑक्टोबर : आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातला वाद काही केल्या संपायचं नाव घेत नाहीये. रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर खोक्यांचा आरोप केला होता. या आरोपांवर बच्चू कडूंनी पलटवार केला. 50 आमदारांना खोके दिले का? हे आता शिंदे-फडणवीस यांनीच स्पष्ट करावे, असं प्रत्युत्तर बच्चू कडू यांनी दिलं होतं. यानंतर आज पुन्हा एकदा बच्चू कडूंनी रवी राणांवर जास्त टीका केली आहे. काय म्हणाले आमदार बच्चू कडू - सध्या अमरावतीत आमदार रवी राणा व आमदार बच्चू कडू यांच्या जोरदार वाद सुरू आहे. आज रात्री मुंबईत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत रवी राणा व बच्चू कडू यांची बैठक आहे. मात्र, या बैठकीपूर्वी अमरावतीच्या तिवसा येथे बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाच्या वतीने बच्चू कडू यांची रक्ततुला करण्यात आली. या कार्यक्रमात बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आमदार रवी राणांवर जोरदार टीका केली. राणा, फाना हवेच्या फुटान्यासारखे फोडून टाकतो, अशी टीका त्यांनी केली आहे. सात-आठ पक्ष जरी एकत्र आले तरी आमचा पराभव होऊ शकत नाही, असंही बच्चू कडू यांनी सांगितले. एकंदरीतच बच्चू कडू यांनी आज मुंबई जाण्यापूर्वीच रवी राणा यांना थेट फुटान्यासारखं फोडण्याची धमकी दिल्याने हा वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा - Bachhu Kadu : बच्चू कडू लवकरच मंत्रिपदी दिसतील, मंत्री दीपक केसरकरांकडून बच्चू कडूंची मनधरणी याआधीही पलटवार - ‘सत्तेवर लाथ मारणारा माझ्या सारख्या स्वाभिमानी माणूस असले आरोप सहन करणार नाही. त्यामुळे मी राणा यांच्यावर पोलिसात गुन्ही दाखल केला आहे. आरोप सिद्ध करावेत नाहीतर माफी मागवी, त्यांना जशाच तसे उत्तर देऊ, असा जोरदार पलटवार बच्चू कडूंनी यांनी केला आहे.