जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Bachhu Kadu : बच्चू कडू लवकरच मंत्रिपदी दिसतील, मंत्री दीपक केसरकरांकडून बच्चू कडूंची मनधरणी

Bachhu Kadu : बच्चू कडू लवकरच मंत्रिपदी दिसतील, मंत्री दीपक केसरकरांकडून बच्चू कडूंची मनधरणी

Bachhu Kadu : बच्चू कडू लवकरच मंत्रिपदी दिसतील, मंत्री दीपक केसरकरांकडून बच्चू कडूंची मनधरणी

दोन आमदारांचा पाठींबा असलेले बच्चू कडू यांनी तर जाहीर नाराजी व्यक्त केली. यावर त्यांची मनधरणी करण्याचे काम सुरू आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 ऑक्टोबर : मागच्या तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेतून बंडखोरी करत 40 आमदारांसह 10 अपक्ष आमदारांनी भाजपला पाठींबा देत सत्ता स्थापन केली. यानंतर काही दिवसांनी मंत्रीमंडळ विस्तार करण्यात आला. यामध्ये अपक्षांना संधी दिली जाईल असे बोलले जात होते परंतु बंच्चु कडू यांच्यासह कोणत्याही अपक्षाला संधी न मिळाल्याने नाराजीचा सूर दिसून आला. यामध्ये दोन आमदारांचा पाठींबा असलेले बच्चू कडू यांनी तर जाहीर नाराजी व्यक्त केली. यावर त्यांची मनधरणी करण्याचे काम सुरू आहे. बच्चू कडू यांनी सबुरीने घ्यावे ते लवकरच मंत्रीपदावर असतील असे सूचक वक्तव्य मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.

जाहिरात

केसरकर म्हणाले की, बच्चू कडू हे जेष्ठ नेते असून, त्यांच्याबरोबर दोन आमदार आहेत. अन्य आमदारांच्यावतीने ते बोलत असतील तर, मला त्यातील वस्तुस्थिती माहिती नाही. लवकरच ते मंत्रीपदी दिसतील, अशी आमची अपेक्षा आहे. जे व्यक्ती मंत्री होणार आहेत, त्यांनी थोड संयम ठेवायला हवा, असे दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा :  ‘लोक तुमच्या मागे फिरावे यासाठी तुम्ही कर्ज..’; राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांवर गंभीर आरोप

बच्चू कडूंनी दिली सरकारला थेट इशारा

बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातला वाद काही केल्या संपायचं नाव घेत नाहीये. रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर खोक्यांचा आरोप केला होता. या आरोपांवर बच्चू कडूंनी पलटवार केला आहे. 50 आमदारांना खोके दिले का? हे आता शिंदे-फडणवीस यांनीच स्पष्ट करावे, असं प्रत्युत्तर बच्चू कडू यांनी दिलं आहे.

जाहिरात

‘महाराष्ट्राच्या विकासाची खुंटकेली गती वाढवण्यासाठी आणि जनादेशाचा आदर करुन राज्यातील 50 आमदारांनी स्वतः हून एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. अनेकांनी तर मंत्री असूनही त्याचा त्याग केला आणि शिंदेना समर्थन दिले. त्यावेळेपासून ठाकरे गटाकडून या 50 आमदारांवर खोके घेतल्याचे आरोप होत आहेत,’ असं बच्चू कडू म्हणाले.

‘विरोधक म्हणून आणि सत्तेवरुन पायउतार व्हावं लागल्यामुळे त्यांचे आरोप आम्ही समजू शकतो, त्याला जनताही फारशी गांभीर्याने घेत नाही. मात्र आता कधी आघाडीच्या तर कधी भाजपच्या आडोशाला राहून स्टंटबाजी करणा-या आमदार रवी राणा यांच्याकडूनच खोक्यांचे आरोप माझ्यावर झाले आहेत’, अशी घणाघाती टीका बच्चू कडू यांनी केली.

जाहिरात

हे ही वाचा :  शिंदे-फडणवीसांआधी ठाकरेंनी पुन्हा मारली बाजी, आदित्य गुरूवारीच मैदानात!

‘सत्तेवर लाथ मारणारा माझ्या सारख्या स्वाभिमानी माणूस असले आरोप सहन करणार नाही. त्यामुळे मी राणा यांच्यावर पोलिसात गुन्ही दाखल केला आहे. आरोप सिद्ध करावेत नाहीतर माफी मागवी, त्यांना जशाच तसे उत्तर देऊ, असा जोरदार पलटवार बच्चू कडून यांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात