नागपूर 09 जुलै : नागपूर पोलिसांनी एका दुहेरी हत्याकांडाचा (Nagpur Double Murder) उलगडा केला आहे. या घटनेत नदीपात्रात दोघांचे मृतदेह आढळले होते. यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला. यावेळी हत्येतील आरोपी आणि कारणाचा खुलासा झाला. महत्त्वाचं म्हणजे समाजात प्रतिष्ठा कमी झाल्याने भावानेच भावाची हत्या केल्याचं या घटनेत पुढे आलं आहे. अशी ही ‘दुर्गा’, दारुड्या नवऱ्याला जेलमधून सोडण्यासाठी महिलेचा किळसवाणा धिंगाणा स्वत:ची पत्नी सोडून आधीच लग्न झालेल्या दुसऱ्या महिलेसोबत राहणाऱ्या भावामुळे समाजात बदनामी होत असल्याच्या कारणावरून सख्ख्या भावानेच तरुणाची हत्या केली, असल्याचं समोर आलं आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेतीच्या कारणावरून अगोदरच या दोघा भावांमध्ये वाद सुरू होता. त्यातच बदनामीमुळे आगीत तेल ओतलं गेलं. उत्तम बोडखे आणि सविता परमार या दोघांची हत्या आरोपी राहुल बोडखे , खुशाल बोडखे , विजय बोडखे आणि आकाश राऊत यांनी केली आहे. मृतक आणि आरोपी हे मूळचे वाशीम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील आहेत. 16 वर्षांच्या मुलीवर जडलं प्रेम; पोलिसांनी मध्यस्थी केली तरीही तरुणाचं टोकाचं पाऊल शेतीचा वाद मिटवण्याच्या बहाण्याने त्यांना बोलावण्यात आलं होतं. यानंतर चालत्या कारमध्ये या दोघांची गळा चिरून हत्या केली गेली. यानंतर मृतदेह नागपूरच्या बुट्टीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नदी पात्रात फेकून देण्यात आला होता. पोलिसांनी सुरुवातीला मृतकांची ओळख पटवली. त्यानंतर या हत्याकांडाचा उलगडा झाला. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. पोलीस सध्या या घटनेची कसून चौकशी करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.