जाहिरात
मराठी बातम्या / देश / 16 वर्षांच्या मुलीवर जडलं प्रेम; पोलिसांनी मध्यस्थी केली तरीही तरुणाचं टोकाचं पाऊल

16 वर्षांच्या मुलीवर जडलं प्रेम; पोलिसांनी मध्यस्थी केली तरीही तरुणाचं टोकाचं पाऊल

16 वर्षांच्या मुलीवर जडलं प्रेम; पोलिसांनी मध्यस्थी केली तरीही तरुणाचं टोकाचं पाऊल

हा मुलगा सतत मुलीला वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन करून तिला धमकावत होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्‍ली, 8 जुलै : दिल्लीत 16 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याबाबत दिल्ली महिला आयोगाने (Delhi Commission for women) दिल्ली पोलिसांना (Delhi Police) नोटीस बजावून आरोपींना अटक करण्यास सांगितले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण -  दिल्ली महिला आयोगाने दिलेल्या माहितीत असे सांगण्यात आले की, दिल्लीतील टिळक नगर भागात 16 वर्षीय मुलीवर चाकूने अनेक वार हल्ला करण्यात आला. मुलीच्या आईने दिल्ली महिला आयोगाकडे (DCW) तक्रारीत सांगितले की, त्यांना एक 16 वर्षांची मुलगी आहे आणि एक मुलगा तिच्या मुलीसोबत कोचिंग सेंटरमध्ये शिकत असे आणि तिला त्रास देत होता. हा मुलगा सतत मुलीला वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन करून तिला धमकावत होता. स्थानिक पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी त्यांना या प्रकरणात तडजोड करण्यास सांगितले होते. मुलीच्या आईने सांगितले की, 7 जुलै 2022 रोजी मुलाने आपल्या मुलीवर चाकूने अनेक वार केले. सध्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि तिची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणाची दखल घेत आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आणि याप्रकरणी केलेल्या कारवाईचा अहवाल मागवला आहे. नोटीसमध्ये आयोगाच्या अध्यक्षांनी या प्रकरणी नोंदवलेली एफआयआर आणि करण्यात आलेल्या अटकेचा तपशील मागवला आहे. याआधी मुलीने केलेल्या तक्रारीवर काय कारवाई केली याचा तपशीलही आयोगाने मागवला आहे. याशिवाय आयोगाने आधीच्या तक्रारीवर तोडगा काढण्याच्या संदर्भात आईने केलेल्या आरोपांबाबत केलेल्या चौकशीचीही माहिती मागवली आहे. हेही वाचा -  मोबाईल नंबरच्या आधारे ओळख, नंतर लग्नाची जबरदस्ती करत घरात घुसून धक्कादायक कृत्य दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी सांगितले की, ‘आमच्याकडे एक अतिशय गंभीर प्रकरण समोर आले आहे, एका 16 वर्षांच्या मुलीवर एका मुलाने चाकूने हल्ला केला होता, जो बराच काळ तिचा पाठलाग करत होता आणि तिला धमकावत होता. मुलीच्या आईने आरोप केला आहे की, पोलिसांनी तिला तिच्या आधीच्या तक्रारीवर तोडगा काढण्यास सांगितले. मी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली असून केलेल्या कारवाईचा अहवाल मागवला आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करून आदर्श घालून दिला पाहिजे, असेही दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल म्हणाल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात