नागपूर 05 सप्टेंबर : राज्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तर अनेक ठिकणी अजूनही मध्येच मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे पाऊस थांबला तरी नद्यांना भरपूर पाणी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पावसाळ्यात विशेषतः पाण्याचा प्रवाह जास्त असलेल्या ठिकाणी जाताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून वारंवार केलं जात आहे. मात्र, तरीही अनेक दुर्घटना समोर येत आहेत.
डॉक्टरांसोबत बोलतानाच अचानक आला हृदयविकाराचा झटका, पुढे जे घडलं ते आश्चर्यकारक, कोल्हापुरातील Video
नागपूरमधूनही सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात सांड नदीमध्ये एक तरुण वाहून गेला आहे. संजय नागपूरे असं या व्यक्तीचं नाव होतं. हा तरुण पुलावरुन पायी निघाला होता. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पायी रस्ता ओलांडताना तो प्रवाहासोबत वाहून गेला.
नागपूर : हा तरुण पुलावरुन पायी निघाला होता. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो प्रवाहासोबत वाहून गेला. pic.twitter.com/95XwCgzuwi
— News18Lokmat (@News18lokmat) September 5, 2022
संजय ला वाचवण्यासाठी एक तरुण मदतीला धावला. मात्र प्रवाह जास्त असल्याने तोही पाण्यासोबत वाहत जाऊ लागला. परंतु, पोहता येत असल्याने त्याने कसा तरी आपला जीव वाचवला. मात्र, संजयला वाचवण्यात तो अपयशी ठरला. सध्या संजयचा कोणताही पत्ता नसून स्थानिक आपल्या स्तरावर त्याचा शोध घेत आहे.
मुलीपेक्षा वरचढ अन् हुशार असलेल्या वर्गमित्राला आईनं विष देऊन संपवलं
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. प्रत्यक्षदर्शींनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे. यात दिसतं की संजय पाण्यासोबत वाहत जात आहे, इतक्यात एक तरुण पाण्यात उतरत संजयला वाचवण्यासाठी त्याचा हात धरण्याचा प्रयत्न करतो. मात्र, पाण्याचा प्रवाह इतका जास्त असतो, की हे दोघंही वाहून जाऊ लागतात. यानंतर मदतीसाठी गेलेला तरुण संजयचा हात सोडून स्वतःचा जीव वाचवतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.