जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / मुलीपेक्षा वरचढ अन् हुशार असलेल्या वर्गमित्राला आईनं विष देऊन संपवलं

मुलीपेक्षा वरचढ अन् हुशार असलेल्या वर्गमित्राला आईनं विष देऊन संपवलं

मुलीपेक्षा वरचढ अन् हुशार असलेल्या वर्गमित्राला आईनं विष देऊन संपवलं

पालकांच्या आपल्या मुलांकडून असलेल्या महत्त्वाकांक्षा अतिरेकी असल्या, तर किती टोकाचं कृत्य त्यांच्या हातून घडू शकतं, याची प्रचीती देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    पुदुच्चेरी : सध्या सर्वच क्षेत्रांत स्पर्धा प्रचंड वाढली आहे आणि त्याची सुरुवात शालेय शिक्षणापासूनच होते. पालकांच्या आपल्या मुलांकडून असलेल्या महत्त्वाकांक्षा अतिरेकी असल्या, तर किती टोकाचं कृत्य त्यांच्या हातून घडू शकतं, याची प्रचीती देणारी एक दुर्दैवी घटना पुदुच्चेरीमध्ये (Puducherry) कराईकल येथे नुकतीच घडली आहे. आपल्या मुलीचा वर्गमित्र शैक्षणिक आणि अन्य सर्वच उपक्रमांमध्ये नेहमीच सर्वप्रथम येत असल्याने त्या मुलीच्या आईने त्याला विषबाधा (Posioning) घडवून आणून त्याचा जीव घेतला. 42 वर्षांची ही महिला आता खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात असून, तिच्या असूयेमुळे 13 वर्षांच्या मुलाला हकनाक बळी जावं लागलं आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. जे. सगयरानी व्हिक्टोरिया (J. Sagayarani Victoria) असं आरोपी महिलेचं नाव असून, बालमणिकंडन असं मृत मुलाचं नाव आहे. आरोपी महिलेची मुलगी आणि बालमणिकंडन हे दोघंही आठवीत शिकत होते. आपल्या मुलीपेक्षा बालमणिकंडन कायमच सरस ठरत असल्याने महिलेला त्याच्याबद्दल असूया वाटायची. त्यातूनच तिच्या मनात काही तरी वेगळंच शिजू लागलं. शाळेचं शुक्रवारी (2 सप्टेंबर)अ‍ॅन्युअल डे फंक्शन होतं. त्या दिवशी तिने डाव साधला. त्या सोहळ्यातल्या सांस्कृतिक कार्यक्रमात बालमणिकंडनचा सहभाग होता. त्या वेळी आरोपी महिलेने शाळेबाहेरच्या वॉचमनची भेट घेऊन त्याच्याकडे शीतपेयाच्या दोन बाटल्या दिल्या. तसंच, आपण बालमणिकंडनची (Balamanikandan) आई असून, सांस्कृतिक कार्यक्रमानंतर हे पेय त्याला पिण्यासाठी द्यावं, अशी विनंती तिने त्या वॉचमनकडे केली. त्यानुसार वॉचमनने त्या बाटल्या बालमणिकंडनकडे नेऊन पोहोचवल्या आणि तो त्यातलं पेय (Soft Drink) प्यायला; मात्र नंतर जेव्हा तो घरी पोहोचला, तेव्हा त्याला उलट्या व्हायला लागल्या.

    News18

    हेही वाचा-पुण्यात स्पा, मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, थायलंडमधील महिलेचसह तिघांची सुटका त्याच्या आई-वडिलांनी तातडीने त्याला एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे उपचारांनंतर त्याला घरी सोडण्यात आलं. शनिवारी (3 सप्टेंबर) त्याची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली. त्यानंतर त्याला कराईकलच्या (Karaikal Government General Hospital) सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं; मात्र त्याची झुंज अपयशी ठरली आणि शनिवारी रात्री त्याची प्राणज्योत मालवली, अशी माहिती कराईकलचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक आर. लोकेश्वरन यांनी दिली. दरम्यानच्या काळात, मृत्यूपूर्वी बालमणिकंडनने आपल्या आजारपणाचं संभाव्य कारण आपल्या आईला सांगितलं होतं. आईने वॉचमनकडे पाठवलेलं शीतपेय प्यायल्यानंतर आपल्याला असं व्हायला लागलं, असं त्याने सांगितलं. बालमणिकंडनच्या आईने तर काहीच पाठवलं नव्हतं. त्यामुळे यात काही तरी काळंबेरं आहे असा संशय बालमणिकंडनच्या आईला आला. त्यामुळे तिने कराईकल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सगळ्या घटनांचा छडा लावून शनिवारीच आरोपी महिलेला अटक केली. पोट साफ होण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक औषधाची मात्रा मिसळलेल्या पेयाच्या दोन बाटल्या आपण बालमणिकंडनला देण्यासाठी वॉचमनकडे दिल्याचं आरोपी महिलेने तपासादरम्यान कबूल केलं, अशी माहिती लोकेश्वरन यांनी दिली. हेही वाचा-चालत्या ट्रकचं चाक निघालं, आणि असं घडलं की…, भंडाऱ्यात दोन ट्रक आणि बसचा विचित्र अपघात त्यानंतर पोलिसांनी खुनाच्या आरोपाखाली तिला अटक केली. स्थानिक कोर्टाच्या आदेशानंतर तिची रवानगी तुरुंगात केली आहे. आपल्या मुलाने शिक्षणात चांगली कामगिरी करावी, असं प्रत्येक आई-वडिलांना वाटतं; मात्र त्यासाठी आपल्या मुलावर कष्ट घेण्याऐवजी त्याच्या प्रतिस्पर्ध्यांना संपवण्याचा विचार मनात येणंही अत्यंत दुर्दैवी आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात